शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अभी तो खेल शुरु हुआ हैं”, अरबाजला अजगर म्हणत विशाखा सुभेदारांची पॅडीसाठी खास पोस्ट, खेळाचं कौतुकही केलं, म्हणाल्या, “त्याच तंगड्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 13, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Vishakha Subhedar On Paddy Kamble

पॅडीचा खेळ पाहून विशाखा सुभेदार थक्क, खास पोस्ट शेअर करत केलं कौतुक

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. हे पर्व सध्या चर्चेत आलं असून खेळाला रंगत आली आहे. अशातच पहिले दोन आठवडे शांत असलेले पॅडी दादा आता त्यांचा खेळ दाखवत असून प्रत्येक खेळामध्ये त्यांनी बाजी मारली आहे. पॅडी दादांच्या या खेळाचं मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेचा कारकिर्दीवरुन केलेला अपमान पाहून अनेकांनी यावर आक्षेप घेत तिला खडेबोल लगावले. यावेळी पॅडी दादांनी दाखवलेल्या संयमाचं अनेकांनी कौतुकही केलं. (Vishakha Subhedar On Paddy Kamble)

‘बिग बॉस’च्या घरात सातव्या आठवड्यातील पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरुन ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या खेळामध्ये पॅडी दादांनी चपळता दाखवत अरबाज व वैभवला पळता भुई करुन सोडलं. या टास्कमध्ये पंढरीनाथ कांबळेने कोणाशीही न भिडता मोठ्या हुशारीने आणि चतुराईने खेळलेला खेळ साऱ्यांच्या पसंतीस पडला. या खेळात पॅडी कांबळेने विरुद्ध टीममधील अरबाज-वैभवची दमछाक केली.

आणखी वाचा – “मी ट्रॉफी व जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या इन्स्टाग्रामवरुन वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “आपल्यात मतभेद असले तरी…”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

पॅडीचा हा खेळ पाहून त्याची जिवाभावाची मैत्रीण अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने पॅडीसाठी शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. पॅडी दादांचं कौतुक करत विशाखा यांनी लिहिलं आहे की, “काल काय जोरदार खेळ रंगला. तुझं अंदाजे वयवर्षे ५२ असावं. पण बाबो, त्यांना कसलं पळवलं आहेस. मज्जा आली. तू बहारदार खेळला आहेस. पॅडी कांबळे. निक्कीची टकळी सुरु असताना तू जे उत्तर तिला देतोस ना त्यानंतर काय बोलावं ते सुचत नाही. अभी तो खेल शुरु हुआ हैं”.

आणखी वाचा – पॅडी कांबळेने वैभव, अरबाजची दमछाक केली अन्…; मराठमोळ्या अभिनेत्यानेही केलं कौतुक, म्हणाला, “ओव्हर अ‍ॅक्टिव्हपणा…”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

यानंतर अरबाज व वैभवला नाचवतानाचा एक व्हिडीओही त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये अरबाजने पॅडी दादांना दोन पायांच्या मध्ये धरलेलं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “हलके में मत लेना. तंगड्या जरी आडव्या घातल्या तरी त्याच तंगड्या कधी तुझ्याच गळ्यात पडतील सांगता येणार नाही. बरं का रे एssss अजगरा”, असं म्हणत अरबाजला टोला लगावला आहे.

Tags: paddy kamblevishakha subhedarVishakha Subhedar On Paddy Kamble
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
teetiksha tawade and siddharth bodke kokan trip

कोकणचो रुबाब भारी! लग्नानंतर पहिल्यांदाच नवऱ्यासह कोकणात पोहोचली तितिक्षा तावडे, धमाल करतानाचा व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.