टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री तितिक्षा तावडेने मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. या मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट येत आहेत. सध्या या मालिकेमध्ये सात वर्षांचा लिप आला आहे. याचा प्रोमो आता प्रेक्षकांच्या समोर आला असून चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. तितिक्षाने याआधी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सर्वच भूमिका आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात राहिल्या आहेत. (titeeksha tawde and siddharth bodke kokan trip)
तितीक्षा या वर्षी अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यांच्या विवाहसोहळ्याचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसले. या सगळ्या फोटो व व्हिडीओमध्ये दोघांचाही रोमॅंटिक अंदाज बघायला मिळाला होता. सिद्धार्थ व तितीक्षा हे २०१८ साली ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेमध्ये एकत्रित काम करताना दिसून आले होते. या मालिकेदरम्यान त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा – प्रियांका चोप्राच्या दीराचा घटस्फोट, अखेर पाच वर्षांनी जो जोनास व सोफी टर्नर विभक्त
तितीक्षा व सिद्धार्थ सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेलेदेखील पाहायला मिळतात. फिरताना, धमाल-मस्ती करताना दिसतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील अधिक व्हायरल होताना दिसतात. अशातच त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोघंही गणपती सणानिमित्त कोकणात गेलेले दिसून येत आहेत. दोघांनीही व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून कोकणात फिरण्याचा आनंद घेतला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच तितीक्षा नवऱ्यासह माहेरी गेली आहे. तिने सिद्धार्थला भातशेती, कोकणातील घर तसेच आजूबाजूच्या निसर्गाचा सैरसपाटा घडवला आहे.
बायकोने कोकण दाखवतानाचा व्हिडीओ सिद्धार्थने शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने ‘कोंकणचो चेडवा हो नाखवा…’हे गाणं लावलं आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘कोकण’ असं लिहिलं आहे. नवरा बायको शेतात फिरताना तसेच झोपाळ्यावर बसून गप्पा मारतानादेखील दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या व्हिडीओला पसंतीदेखील दर्शवली आहे.