‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात काही दिग्गज कलाकार मंडळींचा समावेश पाहायला मिळत आहे. या पर्वात वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे या स्पर्धकांना पाहणं रंजक ठरतंय. या पर्वाचा सातवा आठवडा सुरु झाला असून हे दोन्ही स्पर्धक तुफान राडे करताना दिसत आहेत. विशेषतः पंढरीनाथ कांबळे यांचा या घरातील वावर प्रेक्षकांना खूप भावतोय. आजवर पॅडीने त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमधून पॅडी कांबळेचा संयम पाहून त्याच सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला शांत असलेला पॅडी आता चतुराईने खेळू लागला आहे. (Siddharth Jadhav On Paddy Kamble)
काही दिवसांपूर्वीचं जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेचा त्याच्या अभिनय कारकिर्दीवरुन केलेला अपमान अनेकांना खटकला मात्र यावेळी त्याने दाखवलेला समजूतदारपणा व संयम पाहून साऱ्या प्रेक्षकांमध्ये तो हिरो ठरला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी जान्हवीला फटकारत पॅडीचे कौतुक केलेले पाहायला मिळाले. अशातच घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरुन ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या टास्कमध्ये पंढरीनाथने कोणाशीही न भिडता मोठ्या हुशारीने व चपळतेने आपला गेम दाखवला.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : चुकीला माफी नाही! निक्कीच्या कानाखाली मारणं आर्याला पडणार महागात, घराबाहेर काढणार का?
घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरुन ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या टास्कमध्ये पंढरीनाथ कांबळेने कोणाशीही न भिडता मोठ्या हुशारीने आणि चतुराईने खेळलेला खेळ साऱ्यांच्या पसंतीस पडला. या खेळात पॅडी कांबळेने विरुद्ध टीममधील अरबाज-वैभवची दमछाक केली. हा खेळ पाहून नेटकऱ्यांनी पॅडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहेच पण, सिद्धार्थ जाधवने देखील पंढरीनाथसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
“Well Played भावा. काही लोकांना ओव्हर अॅक्टिंग वाटत होती. आज त्यांना तुझा ओव्हर अॅक्टिव्हपणा नक्कीच दिसला असेल. कसलं पळवलंस दोघांना. यालाच म्हणतात अनुभव. कडक चपळ”, असं म्हणत सिद्धार्थ जाधवने पॅडी कांबळेच कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे. याआधीही पंढरीनाथची खेळातील कामगिरी पाहून सिद्धार्थने त्याच कौतुक केलं होतं.