शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : प्रशस्त हॉल, भव्य किचन अन् सुंदर देवघर, दिवाळीनिमित्त तितीक्षा तावडेने शेअर केली सासरच्या घराची खास झलक

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 2, 2024 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Titeeksha Tawde and actor Siddharth Bodkene shared a special video of their home in Nashik.

सिद्धार्थ-तितीक्षा यांनी नाशिकमधील सासरच्या घराची खास झलक केली शेअर, इतके भव्य आणि प्रशस्त आहे नवीन घर

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. याचसह मोठ्या पडद्यावरही सक्षम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या आपलं स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यावरील सध्या तितीक्षा ची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयाने जितकी चर्चेत असते. तितकीच ती तिच्या सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.  (Titeeksha Siddharth Nashik Home)

त्याचबरोबर तितीक्षा युट्यूबवरही तितकीच सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या युट्यूब वाहिनीद्वारे रोजचे दैनंदीन अपडेट्स देत असते. युट्यूबच्या माध्यमातून ती तिचे व्लॉग व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिने युट्यूबवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधून तितीक्षाने तिची सासरच्या म्हणजेच नाशिकच्या घराची खास झलक शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिचे ही सासरचे घर नवीन असल्याचे सांगितले आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तितीक्षा व सिद्धार्थ यांनी आपल्या नवीन घराची खास सफर चाहत्यांना घडवून आणली आहे.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर रणवीर-दीपिका यांनी लेकीचं केलं बारसं, खास फोटोही शेअर केला अन्…; काय आहे चिमुकलीचं नाव?

तितीक्षाने या नवीन घराच्या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांचे ही नवीन घर खूपच प्रशस्त आहे. नाशिकमधील सर्वात उंच इमारतींपैकी एका इमारतीमध्ये त्यांनी ही नवं घर घेतलं असून या नवीन घरातून संपूर्ण नाशिक शहर व गोदावरी नदी दिसत असल्याचेही त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. घराच्या प्रशस्त हॉलमध्ये एका भिंतीवर सिद्धार्थलं मिळालेली पारितोषिके आणि बक्षीसे ठेवलेले आहेत. तसंच त्यांच्या लग्नातील काही खास फोटोदेखील ठेवण्यात आलेले आहेत. याशिवाय एका भिंतीवर मंडला आर्टची भव्य फ्रेम लावलेली आहे. हॉलला लागूनच सुंदर असं स्वयंपाक घर आहे.   

आणखी वाचा – ‘फटाके फोडू नका’ म्हणताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ट्रोल, नंतर माफीही मागितली अन्…; म्हणाला, “माझा उद्देश…

यापुढे तितीक्षा व सिद्धार्थ यांनी त्यांच्या खोलीची खास झलकही शेअर केली आहे. पुढे त्यांनी घरातील देवघराची संपूर्ण झलक दाखवली आहे. यामध्ये सर्व देवीदेवतांचे फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच तितीक्षाने तिच्या सासूबाई साईभक्त असल्याचेही या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर लग्न होताच तितीक्षाने या नवीन घरात यावं अशी सर्वांचीच इच्छा होती. पण ते होऊ शकलं नाही. पण दिवाळीनिमित्ता या नवीन घरात तितीक्षाने प्रवेश केला असल्याचे सिद्धार्थने सांगितलं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांनी घराची संपूर्ण झलक दाखवली असून त्यांच्या घराच्या नेमप्लेटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi newsTiteeksha Tawde and Siddharth Bodke Nashik Home
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Janhavi Killekar Lakshmi pooja of her mother-in-law video shared the video on social media

Video : पाय धुतले, पाया पडली, अन्...; लक्ष्मीपूजनाला जान्हवी किल्लेकरने केली सासूबाईंची पूजा, नेटकऱ्यांकडून कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.