‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन काहीच दिवसांपूर्वी संपला. या सीझनमध्ये सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत ‘बिग बॉस’चा पाचवा सीझन चांगलाच गाजवला. या सीझनमध्ये चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवीने बिग बॉसचा खेळ गाजवत टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. ‘बिग बॉस’च्या घरातील सुरुवातीच्या दिवसांतील तिचा खेळ कोणालाच पटला नव्हता. पण, कालांतराने जान्हवीला तिची चूक उमगली आणि ती निक्की-अरबाजच्या ग्रुपपासून वेगळी होऊन एकटी गेम खेळू लागली. सुरुवातीच्या दिवसांत सर्वांना राग येणाऱ्या जान्हवीवर नंतर मात्र सगळे प्रेम करू लागले. ‘बिग बॉस’च्या घरात ती टास्क-क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली. (Janhavi Killekar mother-in-law lakshmi pooja)
‘बिग बॉस’च्या घरात इतरांना अपमानास्पद देणाऱ्या जान्हवीला नंतर मात्र तिची चूक उमगली. तिने पॅडी कांबळेंची माफी मागितली. वर्षा उसगांवकरांबरोबरही तिने चांगले संबध राखले. बिग बॉसच्या घरात तिने टास्कसाठी सगळ्या गोष्टी केल्याची कबुली दिली. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या सुरुवातीला व्हिलन ठरलेली जान्हवी आता हिरोईन झाली असं म्हणायला हरकत नाही. अशातच जान्हवीने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुले अभिनेत्री सध्या कौतुकास पात्र ठरत आहे. नुकताच काल (१ नोव्हेंर शुक्रवार) लक्ष्मीपूजन पार पडले, यादिवशी घराघरांत लक्ष्मीपूजन केलं जातं.
आणखी वाचा – ‘फटाके फोडू नका’ म्हणताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ट्रोल, नंतर माफीही मागितली अन्…; म्हणाला, “माझा उद्देश…
या लक्ष्मीपूजनाच्या खास दिवशी जान्हवीने तिच्या घरच्या सर्व स्त्रियांचं पूजन केलं. जान्हवीने घरातील सर्व स्त्रियांचे पाय धुतले आणि त्यांची पूजा केली, यावेळी तिने तिच्या सासूबाईंचेही पाय धुतले, स्वत:च्या साडीच्या पदराने त्यांचे पाय पुसले आणि त्यांची पूजा केली. यावेळी तिच्याबरोबर पती किरण किल्लेकर आणि मुलगा इशान हेदेखील उपस्थित होते. सासूबरोबरच जान्हवीने किल्लेकर कुटुंबातील् सर्व स्त्रियांचे पाय धूत त्यांचे पूजन केले आहे. अभिनेत्रीच्या याच कृतीमुळे सोशल मीडियावर तिचे कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जान्हवीच्या या कृतीचे कौतुक करत एकाने असं म्हटलं आहे की, “आज मन अंतःकरणातून रडलं आहे की, जान्हवी ताई एक चांगली लेक, सून, वहिनी, मामी व चांगली अभिनेत्री आहे. असे आजकाल कोणी पाया पडत नाही. पण आज ताई तुम्ही पाय धवून पूजा करून पाया पडलात ही परंपरा आपली संस्कृती तुम्ही जपली”. तर आणखी एकाने कमेंटद्वारे असं म्हटलं की, “महाराष्ट्र ला खरच आशा माऊली ची गरज आहे”. याचबरोबर अनेकांनी “खरी लक्ष्मी तु आहेस.. संस्कारी मुलगी”, “जानवी तू मोठा आदर्श समाजापुढे मांडला आहेस”, “खरच जान्हवी ताई तु खुपच गोड आहेस” अशा अनेक कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे.