‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. याचसह मोठ्या पडद्यावरही सक्षम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या आपलं स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यावरील सध्या तितीक्षा ची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री तिच्या अभिनयाने जितकी चर्चेत असते. तितकीच ती तिच्या सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. (Titeeksha Siddharth Nashik Home)
त्याचबरोबर तितीक्षा युट्यूबवरही तितकीच सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या युट्यूब वाहिनीद्वारे रोजचे दैनंदीन अपडेट्स देत असते. युट्यूबच्या माध्यमातून ती तिचे व्लॉग व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिने युट्यूबवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधून तितीक्षाने तिची सासरच्या म्हणजेच नाशिकच्या घराची खास झलक शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिचे ही सासरचे घर नवीन असल्याचे सांगितले आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तितीक्षा व सिद्धार्थ यांनी आपल्या नवीन घराची खास सफर चाहत्यांना घडवून आणली आहे.
तितीक्षाने या नवीन घराच्या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांचे ही नवीन घर खूपच प्रशस्त आहे. नाशिकमधील सर्वात उंच इमारतींपैकी एका इमारतीमध्ये त्यांनी ही नवं घर घेतलं असून या नवीन घरातून संपूर्ण नाशिक शहर व गोदावरी नदी दिसत असल्याचेही त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. घराच्या प्रशस्त हॉलमध्ये एका भिंतीवर सिद्धार्थलं मिळालेली पारितोषिके आणि बक्षीसे ठेवलेले आहेत. तसंच त्यांच्या लग्नातील काही खास फोटोदेखील ठेवण्यात आलेले आहेत. याशिवाय एका भिंतीवर मंडला आर्टची भव्य फ्रेम लावलेली आहे. हॉलला लागूनच सुंदर असं स्वयंपाक घर आहे.
आणखी वाचा – ‘फटाके फोडू नका’ म्हणताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ट्रोल, नंतर माफीही मागितली अन्…; म्हणाला, “माझा उद्देश…
यापुढे तितीक्षा व सिद्धार्थ यांनी त्यांच्या खोलीची खास झलकही शेअर केली आहे. पुढे त्यांनी घरातील देवघराची संपूर्ण झलक दाखवली आहे. यामध्ये सर्व देवीदेवतांचे फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच तितीक्षाने तिच्या सासूबाई साईभक्त असल्याचेही या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर लग्न होताच तितीक्षाने या नवीन घरात यावं अशी सर्वांचीच इच्छा होती. पण ते होऊ शकलं नाही. पण दिवाळीनिमित्ता या नवीन घरात तितीक्षाने प्रवेश केला असल्याचे सिद्धार्थने सांगितलं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ यांनी घराची संपूर्ण झलक दाखवली असून त्यांच्या घराच्या नेमप्लेटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.