Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून या शोची बरीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षक मंडळी तसेच कलाकार मंडळी ‘बिग बॉस’ शोवर टिप्पणी करताना दिसतात. अनेक कलाकार मंडळी ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांच्या चुका अमान्य असल्याचे म्हणत त्यांना थेट सवाल करताना व सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाच्या चालीवर लक्ष ठेवून असलेल्या एक मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजेच लावणी क्वीन आणि ‘बिग बॉस’ फेम सुरेखा कुडची. सुरेखा कुडची यांनी ‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व सुरु झाले तेव्हापासून घरातील स्पर्धकांवर भाष्य केलेलं पाहायला मिळालं.
विशेषतः जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळी यांच्याकडून झालेला अपमान सुरेखा कुडची यांना सहन झालेला नाही. कलाकारांच्या अभिनयावर, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणाऱ्या निकिता तांबोळी व जान्हवी किल्लेकरला सुरेखा कुडची यांनी चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळालं. सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत अनेकदा त्या भडकलेला दिसल्या. यानंतर नुकत्याच झालेल्या कालच्या भागात जान्हवी किल्लेकरच्या वागणुकीवर पुन्हा एकदा सुरेखा कुडची यांनी भाष्य केलेलं पाहायला मिळालं.
सुरेखा यांनी असं म्हटलं की, जेलमध्ये गेल्यानंतरही जान्हवीचा हा माज काही उतरलेला नाही, असं म्हणत तिने जान्हवीला ट्रोल केलं. यापूर्वी जान्हवीने पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर यांचा अपमान केला आणि आता निक्की बरोबरच्या वादानंतर ती निक्कीचा अपमान करताना दिसत आहे. मात्र अपमानाची भाषा तिच्या तोंडून जात नसल्याचे म्हणत त्यांनी हे तिची कानउघडणी केलेली पाहायला मिळत आहे. सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत, “मला तरी असं वाटतंय, जान्हवीला ज्या कारणासाठी जेलमध्ये टाकले आहे त्यांनतर तिच्या वागण्यात काही फरक जाणवतोय का?. फरक इतकाच आहे की, आधी वर्षा ताई आणि पंढरीनाथला बोलायची आता निक्कीला बोलतेय. बाकी बोलणं तसंच माज तोच बॉडी लँग्वेज तशीच आणि इतकी मैत्री की जी निक्की जेव्हा बोलत नव्हती तेव्हा हिच आहे ना ती जिने तिचा उशीवर बदाम (हर्ट) काढून त्यात लव यू निक्की लिहीलं होत, मिस यू लिहिलं होतं. गळ्यात गळे घालून पप्प्या घेतल्या होत्या.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम शैलेश लोढा यांच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
पुढे त्या म्हणाल्या, “निक्कीसाठी रडली होती. इतकी घनिष्ठ मैत्री आणि अचानक इतका वाईटपणा. एखाद्याने माफी मागितली असती. चुकले म्हणाली असती. नाही का?. आजचा एपिसोड नीट पाहा त्यात ती घनःश्यामला म्हणाली आहे की, डोक्यावर पडला आहेस का?, लाथ घालू का कंबरेत ते ही पाय उचलून. काय म्हणावे आता”, असं म्हणत पोस्ट शेअर करत जान्हवीवर राग व्यक्त केला आहे.