रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : माफी मागितली, एकमेकांना जवळ घेतलं पण…; निक्कीने अरबाजच्या प्रेमाला नाकारलं, म्हणाली, “डरपोक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2024 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 nikki insult arbaaz love

माफी मागूनही निक्कीने केला अरबाजच्या प्रेमाचा अपमान

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सगळेच स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. सध्या या पर्वातील निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांचं नातं बहरत असताना त्यांच्या नात्यात दुरावा आला. कारण निक्कीच्या पाठी अरबाजने केलेलं गॉसिप तिला खटकलं. रितेश देशमुखने भाऊंच्या धक्क्यावर अरबाजचा खरा चेहरा निक्कीसमोर आणला त्यामुळे निक्कीने अरबाजबरोबरची मैत्री तोडली. इतकंच नव्हे तर तिने टीम ए मधून एक्झिटही घेतलेली पाहायला मिळाली.

यानंतर अरबाज व निक्की यांच्यात दुरावा आला असल्याचं पाहायला मिळालं. एकमेकांची तोंडही बघायची नाही म्हणत अरबाज व निक्की हे एकमेकांच्या विरोधात उतरले. दोघांमध्ये तुफान वाद पाहायला मिळत असताना घरातल्या सर्व स्पर्धकांनी अरबाजला पाठिंबा दिला. आणि निक्की विरोधात बरंच भाष्य केलं. अशावेळी अरबाजला निक्कीने मारलेल्या टोमण्यांनी बराच त्रास झाला. निक्कीपासूनचा दुरावा अरबाजला असह्य झाला आणि तो रडू लागला. तेव्हा निक्कीलाही अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : जेलमध्ये टाकूनही बोलणं, माज तोच आणि…; मराठी अभिनेत्रीने घेतला जान्हवीचा समाचार, म्हणाली, “आता निक्कीला बोलते…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मात्र या सगळ्यानंतर कालच्या भागात हा काहीसा भास होता असं वाटत अरबाज व निक्की एकमेकांच्या जवळ आलेले दिसले. अरबाज व निक्की जेव्हा एकत्र बोलायला आले तेव्हा त्यांच्यात जवळीक पाहायला मिळाली आणि दोघांनी एकमेकांची माफी मागत पुन्हा मैत्री केलेली पाहायला मिळाली. मध्यरात्री अरबाज निक्कीच्या कॅप्टन्सी रुममध्येही दिसला. त्यावेळी निक्कीने अरबाजला हे प्रकरण संपवायला संपूर्ण घरासमोर माफी मागायला सांगितली. मात्र अरबाजने उलट तू आधी माफी माग असं सांगितलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाईईई हा काय प्रकार?, आदळआपट, भांडणानंतर निक्की-अरबाजमध्ये फुललं प्रेम, घट्ट मिठी मारली, मध्यरात्री जवळ गेला अन्…

निक्कीनंतरच्या वादानंतर अरबाज तिच्या विरोधात घरच्यांसमोर बरंच काही बोलला. आता पुन्हा त्याने स्वतःहून निक्की कडे गेलेलं घरच्यांना पटणार नाही असं अरबाजला वाटत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अरबाज निक्कीसाठी हार्ट काढतो. आणि मिस यु असं लिहितो. त्यावर निक्की येत, “हे काय केलं आहे” असं म्हणत त्या हार्टच्या इथे “अरबाज पटेल डरपोक आहे”, असं लिहिते. हा प्रोमो पाहून अरबाजच्या प्रेमाचा अपमान त्याच्या लक्षात येईल का?, अरबाज निक्कीसाठी घरच्यांना दुखावणार का हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: bigg boss marathi 5bigg boss marathi new promonikki tamboli and arbaaz patel
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Ishita Raj likes Hardik Pandya

हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाल्यानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या प्रेमात, म्हणाली, "तो मला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.