Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणता स्पर्धक नेमकं काय वागत आहे याची प्रचिती येत नाही आहे. कधी कधी वाद, कधी कधी प्रेम या सगळ्यात नेमकं खरं काय, नेमका खरा चेहरा कोणाचा हे ओळखणे कठीण होऊन बसलं आहे. गेल्या आठवड्यात पाहायला गेलं तर निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांचे जोरदार वाजलं. निक्कीचे सततचे टोमणे अरबाजला असह्य झाले. तर अभिजीत बरोबरची निक्कीची मैत्री ही अरबाजला खटकली. त्यामुळे अरबाजने निक्कीशी बोलणं सोडलं तर एकीकडे भाऊच्या धक्क्यावर निक्कीसमोर तिच्या टीममधील स्पर्धकांचा खरा चेहरा आल्यानंतर तिने टीम ए मधून एक्झिट घेतली असल्याचं सांगितलं.
टीम ए मधून वेगळ झाल्यानंतर निक्की अनेकदा अरबाजला ऐकवताना दिसली. यापूर्वी अरबाज व निक्की यांच्यातील मैत्री, प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र अचानक अरबाज व निक्की दुरावलेले दिसले. अरबाज निक्कीवरील रागापोटी आदळाआपट करतानाही दिसला. किचनमध्ये एखादं भांड फेकून देत तसेच खुर्ची आपटत अरबाजने ‘बिग बॉस’च्या घराचं नुकसान केलं आणि नियमांचे उल्लंघनही केलेलं दिसलं. मात्र या सगळ्यानंतर कालच्या भागात हा काहीसा भास होता असं वाटत अरबाज व निक्की एकमेकांच्या जवळ आलेले दिसले. अभिजीतने निक्कीला एकटी पडू नये म्हणून तू तुझ्या टीममध्ये पुन्हा जा असा सल्ला अगदी सुरुवातीपासून दिला होता. अरबाज व निक्की जेव्हा एकत्र बोलायला आले तेव्हा त्यांच्यात जवळीक पाहायला मिळाली आणि दोघांनी एकमेकांची माफी मागत पुन्हा मैत्री केलेली पाहायला मिळाली.
यावेळी दोघांच्या संभाषणात निक्की अरबाजला म्हणते की, “तुला जर एखादी व्यक्ती आवडत असेल, तर त्याच्यावर रागावताना शब्द जपून वापरायला हवे. तू जसा ओरिजिनल आहेस ते दाखव लोकांना, उगीचच असं नको दाखवू. राक्षसासारखं. हे बरोबर वागला का तू”. निक्कीचं हे बोलणं अरबाज शांतपणे ऐकून घेतो आणि नंतर तिला ‘सॉरी’ म्हणतो. एवढंच नव्हे यानंतर तो तिला मिठीही मारतो. ‘बिग बॉस मराठी’चा हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम शैलेश लोढा यांच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
यावर निक्कीने अरबाजला, “तुझ्या बहिणीला तू माझ्याशी बोलतो हे आवडत नाही” असा टोमणा देखील मारला. यानंतर घरातले सगळे सदस्य झोपल्यावर अरबाजने निक्कीची माफी मागितली. यावर निक्की “आपल्याला पुन्हा घरात सर्वांसमोर असं वागता येणार नाही. कारण, तू माझ्याशी बोललास तर तुझ्या मित्रांना ते आवडत नाही आणि मला आता वैभव-जान्हवी पटत नाहीत”. यानंतर अरबाज व निक्की घरात एकमेकांशी न भांडता मैत्री ठेवून गेम खेळायचं ठरवतात.