सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षय कुमार लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करणार?, भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची शक्यता

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 1, 2024 | 4:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor akshay kumar on election

अक्षय कुमार लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करणार?, भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार चांगलाच चर्चेत आहे. नुकताच तो ‘बडे मियां छोटे मियां’च्या निमित्ताने लखनऊ येथे अभिनेता टायगर श्रॉफसह दिसला होता. त्यानंतर तो उदयपुर येथील एका मुलींच्या वसतीगृहाच्या उद्घाटनप्रसंगीही दिसला असून या वसतीगृहासाठी त्याने १ कोटी रुपये दान केल्याची माहिती मिळाली होती. अक्षय हा त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कामासाठीही आपला खूप वेळ देत असतो. मात्र आता अभिनय, सामाजिक सेवा या व्यतिरिक्त राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत. (Actor akshay kumar on election)

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आता राजकारणात प्रवेश करणार असून येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणुका लढवू शकतो. सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असून प्रत्येक पक्षाने आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये ४ जागांसाठी निवडणूक लढवली जाणार आहे तर कॉँग्रेसतर्फे ३ जागा लढवण्यात येणार आहेत. दिल्लीमध्ये एका नवीन चेहऱ्याला संधी देणार असून यासाठी अक्षयची निवड केली जाऊ शकते. याआधी भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी २०१४ ते २०१९ यादरम्यान  दोन वेळा या जागेवर निवडून आले होते.   

आणखी वाचा – “एका आजाराशी झुंज…”, अनंत अंबानीला करायचं नव्हतं लग्न, लग्नापूर्वीच मोठा खुलासा, स्वतःच म्हणाला, “तिच्या कुटुंबाने मला…”

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार अक्षय दिल्लीतील चांदणी चौकच्या जागेसाठी भाजपद्वारा  निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. भाजप पक्षातील काही नेतेमंडळी याबाबत त्याच्याशी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.अक्षयचे सुरवातीपासूनच भाजपशी चांगले संबंध आहेत. कोरोनाकाळादरम्याने अक्षय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखतही खूप गाजली होती.  

आणखी वाचा – पायाला जखम, हातात शिळी भाकरी अन्…; धर्मेंद्र यांची उतरत्या वयात झालेली अवस्था पाहून सगळेच चक्रावले, अशा परिस्थितीमध्ये का राहत आहे अभिनेता?

दरम्यान अक्षयचे चित्रपट गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर  म्हणावी तितकी जादू करताना दिसत नाही आहेत. सध्या तो त्याच्या ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ,सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर,अलाया एफ व पृथ्वीराज सुकुमारन् मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ९ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

Tags: actor akshay kumarakshay kumarbollywood actorelectionloksabha election
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding

निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; सत्यनारायण पूजेसाठी अशी नटली पूजा सावंत, सासरकडच्या घराचीही दिसली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.