‘आमचं ठरलं’ म्हणत सिनेसृष्टीतील अनेक कलाकार जोड्या मागील वर्षभरात लग्नबंधनात अडकल्या. त्यानंतर अगदी शाही थाटामाटात या जोड्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. तर काहींनी त्यांच्या साखरपुड्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केलेली पाहायला मिळाली. या पाठोपाठ आता आणखी एक कलाकार जोडी लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. गुपचूप साखरपुडा सोहळा उरकत त्यांच्या साखरपुडा समारंभातील काही खास फोटो सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखे पसरत आहेत. ही कलाकार जोडी म्हणजे शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे. (Shivani Surve And Ajinkya Nanaware Engagement Look)
शिवानी व अजिंक्य यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही मात्र हे दोन्ही कलाकार लवकरच लग्न बंधनात अडकणार या चर्चांना मात्र उधाण आलं होतं. आता या चर्चांना पूर्णविराम देत दोघांनी त्यांच्या साखरपुडा सोहळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. ‘अखेर बंधनात’ असं कॅप्शन देत त्यांनी हे खास फोटो शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. यामध्ये दोघांचाही मॉडर्न अंदाज समोर आला असून या अंदाजाला असलेली पारंपरिक जोड साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
शिवानी व अजिंक्य यांच्या समोर आलेल्या साखरपुडा समारंभातील फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवानीने यावेळी फिकट जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी नेसलेली पाहायला मिळाली. तर त्यावर नाजूक असे दागिने आणि हातात हिरवा चुडा असा पारंपरिक लूक पाहायला मिळाला. शिवानीचा मॉडर्न आणि त्याला पारंपरिक टच असलेला फोटो लक्षवेधी ठरला तर यावेळी अजिंक्यने कुर्ता व जॅकेट परिधान केलेल पाहायला मिळालं. आणि डोक्यावर टोपी घालत त्याचाही पारंपरिक अंदाज विशेष भावला. दोघांचाही साखरपुड्यातील हा अंदाज साऱ्या प्रेक्षकांना विशेष भावला. त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – एकत्र काम करण्याबाबत निवेदिता सराफ यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आम्हा दोघांना…”
सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी व त्यांच्या चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटातून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर अजिंक्य ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आता ही जोडी लग्न बंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.