अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा सोहळा उरकत साऱ्यांना सुखद धक्का दिला. याआधी त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही मात्र दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा येत होत्या. दरम्यान लवकरच लग्नबंधनात अडकणार या चर्चांनाही उधाण आलेलं पाहायला मिळालं. आता या चर्चेला अजिंक्य व शिवानी यांनी पूर्णविराम देत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. शाही थाटामाटात दोघांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. (Ajinkya Nanaware And Shivani Surve Haladi)
शिवानी व अजिंक्यच्या साखरपुड्याची अनेक फोटो समोर आलेले पाहायला मिळत आहेत. यांत दोघांचाही हटके लूक साऱ्यांना विशेष भावला. ठाण्यातील येऊर हिल येथे त्यांचा हा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. शिवानी व अजिंक्य यांच्या साखरपुड्याला त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती असलेली पाहायला मिळाली. यानंतर आता शिवानी व अजिंक्य यांच्या हळदी समारंभातील एक व्हिडीओ समोर आला आहे.
लवकरच शिवानी व अजिंक्य लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतेच त्यांच्या हळदी समारंभातील डेकोरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. यांत पिवळ्या रंगाच्या फुलांनी केलेलं डेकोरेशन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या डेकोरेशनने शिवानी-अजिंक्यची हळद उरकली असल्याचं कळत आहे. अगदी पारंपरिक टच असलेलं हे डेकोरेशन विशेष आकर्षणाची बाब ठरत आहे. याशिवाय दोघांच्या साखरपुड्यासाठीही गुलाबी रंगाचे बॅकग्राउंड असलेलं डेकोरेशन करण्यात आलं होतं.
‘अखेर बंधनात’ असं म्हणत अभिनेत्रीने त्यांच्या या साखरपुड्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल फोटोंद्वारे त्यांचा साखरपुड्याचा हटके लूक पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळींनी तसेच चाहते मंडळींनीदेखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.