शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला फरक पडत नाही कारण…”, दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून कोणत्याच गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही प्रिया बापट, म्हणाली, “कोणत्याही सणाला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2023 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priya Bapat And Umesh Kamat

"मला फरक पडत नाही कारण…", दिवाळी पाडव्याला नवऱ्याकडून कोणत्याच गिफ्टची अपेक्षा ठेवत नाही प्रिया बापट, म्हणाली, "कोणत्याही सणाला…"

अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत ही लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी आहे. तब्बल १८ वर्ष प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडप्याच्या संसाराला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र दिसली असून या दोघांनीही त्यांच्या अभिनय कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री जितकी चाहत्यांना आवडते, तितकीच ती ऑनस्क्रीन पाहायलाही आवडते. प्रिया व उमेश हे दोघे सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते एकत्र फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतात. (Priya Bapat And Umesh Kamat)

दिवाळीनिमित्त नुकतीच त्यांनी शेअर केलेली पोस्ट ही लक्षवेधी ठरली. पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करत या जोडीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अशातच दिवाळीनिमित्त घेतलेला प्रिया व उमेशचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ‘मिरची मराठी’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने ‘ दिवाळी पाडवा’ कसा साजरा करतात याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना तिने दिवाळी पाडव्याची आठवण शेअर केली.

आणखी वाचा – Video : …अन् ‘टायगर ३’ चित्रपट सुरु असतानाच थिएटरमध्येच प्रेक्षकांनी फोडले फटाके, पळापळ झाली आणि…; भयानक व्हिडीओ समोर

प्रिया म्हणाली, “माझ्या अशा काही अपेक्षा नसतात, की पाडव्याला मला नवऱ्याने भेटवस्तू द्यावी वा ‘व्हॅलेंटाईन डे’ला गिफ्ट द्यावं. मला काहीही फरक पडत नाही. मला काहीही देऊ नका. माझी ही इच्छा असते की, माझ्या नवऱ्याने त्या दिवशी दिवसातील काही खास क्षण मला द्यावेत, म्हणजे जसं की, एक मिठी वा रस्त्यातून चालताना धरलेला हात. माझ्या यापलीकडे काहीच अपेक्षा नाहीत. मला कधीही असं वाटत नाही की, दिवाळीला मला काय भेटवस्तू देणार, किंवा पाडव्याला मला ओवाळणी म्हणून काय देणार. आज लक्ष्मीपूजन आहे तर आज सोनं घ्यायलाच हवं असं मला काहीही वाटत नाही. मला फराळ करायला आवडतो, आणि मी केलेला फराळ त्याला आवडतो. त्यामुळे कोणत्याही सणवाराला जे करायचं असतं ते मला मनापासून करायला आवडतं”.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

आणखी वाचा – “आता राडा होणार”, अखेर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पुन्हा परतला ओंकार भोजने?, प्रोमो समोर, म्हणाला, “वाटलं तर मी येतो नाहीतर…”

दहा वर्षांपूर्वी प्रिया व उमेश यांनी ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक केलं होतं. पण त्याआधी हे दोघं एकमेकांना डेट करत होते. अखेर २०११ मध्ये प्रिया व उमेश लग्नबंधनात अडकले. तेव्हापासून ही जोडी कामाबरोबरच त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण व्यतीत करताना दिसतात. अभिनयाबरोबरच ही जोडी त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Tags: entertainmentmarathi actormarathi actresspriya bapatumesh kamat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
Next Post
Aadesh Bandekar celebrates Diwali with family

Video : आदेश बांदेकरांच्या एकत्रित कुटुंबाचं सर्वत्र कौतुक, इमारतीच्या पटांगणात औक्षणानंतर कारिट फोडलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.