रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती आणि…”, शेफाली जरीवालाच्या निधनानंतर डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, नक्की काय म्हणाले?

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 28, 2025 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Shefali Jariwala Passed Away

“तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती आणि...”, शेफाली जरीवालाच्या निधनानंतर डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, नक्की काय म्हणाले?

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचं निधन झालं असल्याचं प्राथमिक माहिती समोर आली. मात्र अद्यापही या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरु आहे. पती पराग त्यागी, सिक्युरीटी गार्ड, नोकर यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. दरम्यान शेफालीचं निधन नक्की कशामुळे झालं? याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण शेफालीच्या डॉक्टरांनी काही खुलासे केले आहेत. तिला काही आजार होता का?, शेफाली नक्की कसले उपचार घेत होती? याबाबत डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Actress Shefali Jariwala Passed Away)

‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार डॉक्टरांनी शेफालीबाबत माहिती दिली आहे. शेफाली कोणते उपचार घेत होती का?, नक्की काय घडलं होतं? याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, “तरुण दिसण्यासाठी गेली ५ ते ६ वर्ष ती उपचार घेत होती. एंटी एजिंग उपचार सुरु होते. ती काही औषधंही घेत होती. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि Glutathione या औषधांचा समावेश होता”. पण या सगळ्या औषधोपचारांचा हृदयविकाराशी काहीच संबंध नसल्याचंही डॉक्टरांनी नमुद केलं आहे. तसेच शेफाली अगदी फीट असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – शेफाली जरीवालच्या शेवटच्या पोस्टमध्ये एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख, मृत्यूनंतर पोस्ट व्हायरल, म्हणालेली, “तुझा विचार करत…”

View this post on Instagram

A post shared by Shefali Jariwala 🧿 (@shefalijariwala)

डॉक्टर म्हणाले की, “तरुण दिसण्यासाठीची औषधं फक्त चेहरा गोरा आणि ताजा दिसण्याचेच काम करतात. या औषधांचा परिणाम फक्त त्वचेवरच होतो. ती शारीरिक दृष्ट्या अगदी व्यवस्थित होती. शेफालीला कधीच कोणता आजार नव्हता”. डॉक्टरांनी अगदी स्पष्ट शब्दांत शेफालीच्या शारीरिक आरोग्याबाबत माहिती दिली. अभिनेत्रीला कोणताच आजार नसल्याचं डॉक्टरांच्या बोलण्यामधून सिद्ध झालं आहे.

आणखी वाचा – “तिच्यावर उपचार सुरु होते आणि…”, शेफाली जरीवालाच्या पतीने पोलिसांना नक्की काय सांगितलं?, चौकशी सुरु

शेफालीचं हे दुसरं लग्न होतं. हरमीतसह फक्त पाच वर्षच शेफालीने संसार केला. लग्नाच्या काही वर्षातच दोघांमध्ये वाद सुरु झाले. मानसिक तसेच शारीरिक हिंसाचाराचे आरोपही शेफालीने हरमीतवर केले. मात्र पुन्हा नव्याने संसार थाटण्याचा तिने निर्णय घेतला. पहिल्या घटस्फोटानंतर सहा वर्षांनी तिने २०१५मध्ये पराग त्यागीशी लग्न केलं. दोघांचा अगदी सुखाचा संसार सुरु होता. मात्र अचानक शेफालीच्या जाण्याने पतीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Shefali Jariwala Death

“वेळ आली आहे…”, मृत्यूपूर्वी शेफाली जरीवालाने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, आयुष्याबाबत केलेलं भाष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.