बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वेळ आली आहे…”, मृत्यूपूर्वी शेफाली जरीवालाने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, आयुष्याबाबत केलेलं भाष्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2025 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala Death

“वेळ आली आहे…”, मृत्यूपूर्वी शेफाली जरीवालाने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, आयुष्याबाबत केलेलं भाष्य

Shefali Jariwala Death : २८ जून रोजी चित्रपट आणि टीव्ही जगातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘कांटा लगा’ या गाण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. इतक्या लहान वयात अभिनेत्रीचे निघून जाणे सर्वांना धक्कादायक आहे. या दु: खद बातमीमुळे, मनोरंजन विश्वात शोक व्यक्त केला जात आहे. मृत्यूच्या आधी, शेफालीने काही मोहक फोटोंबरोबरच अलीकडेच एक व्हिडीओ देखील शेअर केला होता, आणि यांत तिने दिलेलं कॅप्शन आता व्हायरल झालं आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओसह असं म्हटलं होतं की, “जगण्याची वेळ आली आहे”.

अभिनेत्रीने स्वप्नातही कधी विचार केला नसेल की तिने आयुष्याबद्दल स्टोरीमध्ये लिहिलेली ओळ काही वेळातच संपणार आहे. अलीकडेच, शेफालीने तिच्या मेकअपचा एक व्हिडीओ शेअर केला ज्यावर लिहिण्यात आले होते की, “आपल्या आयुष्यात जगण्याची वेळ आली आहे, ज्यात सगळं काही आपल्या आवडीचे असेल”. यासह ती काही रहस्य सांगण्याविषयीही बोलताना दिसली आहे.

आणखी वाचा – Shefali Jariwala Passed Away : लेकीच्या निधनाने आईची वाईट अवस्था, रडताना डगमगली अन्…; पत्नीच्या आठवणीत नवरा पराग त्यागीलाही अश्रू अनावर

View this post on Instagram

A post shared by Shefali Jariwala 🧿 (@shefalijariwala)

त्याच वेळी, तीन दिवसांपूर्वी, शेफालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले होते, ज्यात ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसली. शेफालीच्या या पोस्टवर आता लोक तुटून पडले आहेत. नेटकरी या पोस्टवर सतत भाष्य करत असं विचारताना दिसत आहेत की, “अरे देवा, हे खरे आहे का?”. बरेच लोक सतत असे म्हणत आहेत की, “मला विश्वास नाही की ती आता नाही”. आणखी एकाने सांगितले, “यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे, आम्हाला धक्का बसला आहे”.

आणखी वाचा – शेफाली जरीवालच्या शेवटच्या पोस्टमध्ये एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख, मृत्यूनंतर पोस्ट व्हायरल, म्हणालेली, “तुझा विचार करत…”

अशी बातमी आहे की शेफालीला हृदयविकाराचा झटका आला आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले. या अहवालानुसार शेफाली जरीवाला यांना अंधेरी येथील बेलेव्यू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. असे सांगितले जात आहे की आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी शेफालीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिच्यासह तिचा नवरा आणि अभिनेता पराग त्यागी आणि इतर तीन लोक होती.

Tags: actress deathShefali Jariwala Deathviral post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Shefali Jariwala husband viral video

Video : शेफाली जरीवालाचा मृतदेह रुग्णालयात असताना इमारतीमध्ये कुत्र्यासह नवऱ्याचा फेरफटका, हातात पत्नीचा फोटो अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.