शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिच्यावर उपचार सुरु होते आणि…”, शेफाली जरीवालाच्या पतीने पोलिसांना नक्की काय सांगितलं?, चौकशी सुरु

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 28, 2025 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala husband statement

“तिच्यावर उपचार सुरु होते आणि...”, शेफाली जरीवालाच्या पतीने पोलिसांना नक्की काय सांगितलं?, चौकशी सुरु

सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं आहे. ती फक्त ४२ वर्षांची होती. शुक्रवारी (२८ जून) रात्री शेफालीच्या निधनाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. अद्यापही शेफालीचं कुटुंब किंवा डॉक्टरांकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शेफालीला घरातूनच मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं होतं. अंधेरीतील बेलेव्ह्यु मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयात तिला आणलं असता अनेकांना मोठा धक्काच बसला. मात्र काही वेळातच शेफालीला मृत घोषित करण्यात आलं. पत्रकार विकी लालवानीने पोस्ट शेअर करत निधनाची माहिती दिली. आता पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. (Shefali Jariwala husband statement)

शेफालीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तिच्या कुटुंबियांची तसेच तिच्याबरोबर असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत आहेत. अशातच तिच्या घरी फॉरेन्सिक टीमही पोहोचली आहे. पोलिसांनी आतापर्यंत शेफालीचा पती पराग त्यागीसह आणखी तीन व्यक्तींचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये एक नोकर आणि दोन सिक्युरीटी गार्ड यांचाही समावेश आहे. अजूनही पोलिसांची चौकशी पूर्ण झालेली नाही.

आणखी वाचा – ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood Videos (@instantbollywoodvideos)

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, परागने पोलिसांच्या चौकशीमध्ये काही खुलासे केले. आधीच शेफालीवर उपचार सुरु असल्याचं परागने पोलिसांना सांगितलं होतं. आता हे उपचार नक्की कसले होते?, शेफालीला कसला त्रास होत होता?, काही आजार होता का? हे अद्याप समोर आलेलं नाही. पराग शेफालीचा दुसरा पती आहे. २००४मध्ये शेफालीचं पहिलं लग्न झालं होतं. हरमीत सिंहबरोबर शेफालीने संसार थाटला. मात्र लग्नाच्या पाच वर्षांमध्येच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २००९मध्ये शेफाली व हरमीतचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा – “मुंबईत मराठीची वाट लागली”, हिंदी सक्तीनंतर मराठमोळा अभिनेत्याचा रोष, स्पष्टच म्हणाला, “भिकारणीची अवस्था…”

शेफालीने पहिला पती हरमीतवर अनेक गंभीर आरोप केले होते. मानसिक छळ, शारीरिक अत्याचार करत असल्याचं शेफालीने म्हटलं होतं. कौटुंबिक वादामधून तिचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या सहा वर्षांनंतर म्हणजेच २०१५मध्ये तिने परागबरोबर लग्न करण्याच निर्णय घेतला. दोघांचा संसार अगदी सुखाचा सुरु होता. त्यांचे फोटो व व्हिडीओ पाहिल्यानंतर ते लक्षातही येतं. शिवाय कलाक्षेत्रातही शेफालीने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. ‘काटा लगा’ गाण्यामुळे तिला आयुष्यभराची एक वेगळीच ओळख मिळाली. शिवाय बिग बॉस १३, नच बलिए ५, नच बलिए ७मध्येही ती सहभागी झाली होती.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Shefali Jariwala security guard statement

“गाडी येताच मीच गेट उघडला आणि...”, शेफाली जरीवालाच्या सिक्युरीटी गार्डने सांगितला घटनाक्रम, त्याला विश्वासच बसला नाही की...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.