शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गाडी येताच मीच गेट उघडला आणि…”, शेफाली जरीवालाच्या सिक्युरीटी गार्डने सांगितला घटनाक्रम, त्याला विश्वासच बसला नाही की…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 28, 2025 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala security guard statement

“गाडी येताच मीच गेट उघडला आणि...”, शेफाली जरीवालाच्या सिक्युरीटी गार्डने सांगितला घटनाक्रम, त्याला विश्वासच बसला नाही की...

सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर संपूर्ण कलाक्षेत्रालाच मोठा धक्का बसला आहे. तिचं वय अवघं ४२ वर्ष होतं. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे शेफालीचं निधन झालं असल्याचं प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. मात्र नक्की कारण काय? याबाबत कोणतीच अधिकृत माहिती कुटुंबिय किंवा पोलिसांकडून समोर आलेली नाही. पोलिस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. काही तासांपूर्वीच फॉरेन्सिक टीमही शेफालीच्या घरी दाखल झाली आहे. अशातच आता पोलिसांनीही शेफालीचा पती पराग त्यागी, सिक्युरीटी गार्ड व नोकर यांची चौकशी केली आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या राहत्या इमारतीमधील सिक्युरीटी गार्डने नक्की काय घडलं? याबाबत सांगितलं. (Shefali Jariwala security guard statement)

शेफाली व पराग यांचं मुंबईतील अंधेरी परिसरात घर आहे. शुक्रवारी (२७ जून) रात्री अचानक धावपळ सुरु झाल्यानंतर सिक्युरीटी गार्डलाही काय झालं? याचा अंदाज येईना. त्याला शेफालीचं निधन झालं असल्याचंही माहित नव्हतं. यासंपूर्ण प्रकरणाबाबत शेफाली राहत असलेल्या इमारतीच्या सिक्युरीटी गार्डने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेफाली व तिचा पती खूप चांगल्या स्वभावाचे आहेत असंही त्याचं म्हणणं आहे. मात्र इतर अधिकृत माहिती देण्यास त्याने नकार दिला.

आणखी वाचा – “तिच्यावर उपचार सुरु होते आणि…”, शेफाली जरीवालाच्या पतीने पोलिसांना नक्की काय सांगितलं?, चौकशी सुरु

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood Videos (@instantbollywoodvideos)

सिक्युरीटी गार्ड म्हणाला की, “मी शेफाली यांना काही पाहिलं नाही. पण त्यांची गाडी इमारती बाहेर जात असताना मीच गेट उघडला. यावेळी सुमारास १० ते १०.१५ वाजले असतील. पण त्यानंतर नक्की काय घडलं? याबाबत मला काहीच माहिती नाही. मला कोणीतरी येऊन सांगितलं की, शेफाली यांचं निधन झालं आहे. तेव्हा रात्रीचे बहुदा १ वाजले असावते. बाईकवरुन कोणीतरी एक व्यक्ती आला त्याने मला शेफाली यांचा फोटो दाखवत निधनाबाबत सांगितलं”.

आणखी वाचा – Shefali Jariwala Passed Away : लेकीच्या निधनाने आईची वाईट अवस्था, रडताना डगमगली अन्…; पत्नीच्या आठवणीत नवरा पराग त्यागीलाही अश्रू अनावर

“त्या व्यक्तीच्या सांगण्यावर मी काही विश्वास ठेवला नाही. कारण शेफाली आधी व्यवस्थित होत्या. त्यांचा तो मित्र असावा. मीही त्याला सांगितलं की, मला निधनाबाबत काही माहीत नाही. तुम्ही घरी जाऊन विचारु शकता. मात्र चौकशी करणारी व्यक्ती घरी न जाता रुग्णालयात गेली”. सिक्युरीटी गार्डला यापुढे अधिक काही माहिती नव्हती. त्याला जे चित्र दिसलं ते त्याने सांगितलं. मात्र आता शेफालीचं निधन म्हणजे एक गुढ आहे. पोलिसही इतका तपास का करत आहेत? असे प्रश्न वारंवार समोर येत आहेत. शिवाय घरीच मृतावस्थेत शेफाली दिसल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Shefali Jariwala Last Twitter Post

शेफाली जरीवालच्या शेवटच्या पोस्टमध्ये एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख, मृत्यूनंतर पोस्ट व्हायरल, म्हणालेली, "तुझा विचार करत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.