चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीनं मध्ये सईचं नाव आवर्जून घेतलं जात. तिच्या हटके फोटोशूटमुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत असते. कधी मनमोहक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते तर कधी विचित्र पोजमुळे ट्रोल देखील होते.सई कायमच नवनवीन लूक्स ट्राय करत असते. आणि तिचे हे फोटोज ती तिच्या सोशल मीडियावरून शेअर करत असते. (Saie Tamhankar Summer look)
पाहा सईचा साडीतील समर लुक (Saie Tamhankar Summer look)
ट्रेंड नुसार कलाकार वेगेगळ्या रूपात पाहायला मिळतात. सध्या कलाकारांचे समर लुक वायरल होतं असतात. सईने देखील तिच्या एका समर फोटो शूटचे फोटो शेअर केले आहेत.सई अनेकदा प्रेक्षकांना तिच्या ग्लॅमर्स आणि बोल्ड अंदाजात पाहायला मिळते. पंरतु सई ने समर लुक साठी साडी मधले फोटो शेअर केले आहेत.फ्लोरल साडी आणि पोलका डॉट असणारा ब्लॉउज असं कॉम्बिनेशन तिने केलेलं पाहायला मिळत आहे. या तिच्या लुक मध्ये तिने घातलेले दागिने हे विशेष आकर्षण ठरत आहेत. तिच्या या फोटोजना सईने समरिंग इन सारी असं कॅप्शन दिलं आहे.अनेक कलाकारांनी तिच्या या फोटज वर कमेंट करून तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.(Saie Tamhankar Summer look)
हे देखील वाचा : ‘सांगलीची जेनिफर लॉरेन्स’..,सईच्या फोटोवर चाहत्यांची मजेशीर कमेंट
सई तिच्या सौंदर्यासोबतच कायमच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकते.मराठी, हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सई महत्वाच्या भूमिकेंमध्ये पाहायला मिळाली. हिंदीमधील मिमी या चित्रपटातील सईच्या भूमिकेचं बरच कौतुक झालं.सध्या सई सोनी मराठीवरील हास्यजत्रा या कॉमेडी शो मध्ये परीक्षक म्हणून पाहायला मिळते आहे. वेगवेगळ्या रूपात सई प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.