मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट म्हणजे ‘सैराट’. नवोदित कलाकार असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील गल्ल्याची गणितंच बदलली. शंभर करोडहून अधिक आणि सर्वाधिक कमाई केलेला हा चित्रपट आहे. यांत आर्ची आणि परश्याच्या जोडीला विशेष प्रेम मिळालं. ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल सात वर्ष झाली असली तरी या चित्रपटाला, चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत. या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरांत पोहोचली. रिंकू नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Rinku Rajguru Troll)
अशातच रिंकूने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या असून चाहत्यांमध्ये या पोस्टची चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. रिंकूने तिच्या आयुष्यात पाहिलेल्या पहिल्या नाटकाबद्दल भाष्य केलं आहे. चित्रपटांसोबतच नाटकांना ही अनन्य साधारण महत्व आहे. रिंकूने नाट्यगृहातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत तिने म्हटलंय, “माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलं नाटक. अप्रतिम अनुभूती…सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे ‘देवबाभळी’. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन.”
पाहा रिंकूच्या पोस्टवर नेटकरी काय म्हणाले (Rinku Rajguru Troll)
रिंकूने ‘देवबाभळी’ हे नाटकं पहिल्यांदा नाट्यगृहात जाऊन पाहिल्याचं सांगितलं आहे. रिंकूच्या या वाक्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नेटकऱ्यांनी या पोस्टखाली कमेंट करत आश्चर्य व्यक्त ही केलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “पहिलं नाटक पाहिलं ते पण आता… आपणच आपल्या मराठी कलाकारांना सपोर्ट नाही करत आणि बोंब होते नाट्यगृह रिकामी राहतात त्याची.. इतक्या मोठ्या पडद्यावरच्या कलाकार होऊन तुम्ही आता पहिलं नाटक पाहिलं अस बोलून सर्वाना आश्चर्यचकित केलं. असो.”
हे देखील वाचा – जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, म्हणालेली, “तेल न वापरता मी…”
“या पुढे ही तुम्ही पाहाल ही अपेक्षा. एकदा ‘सही रे सही’ पहा, निदान अजून चार वेळा तरी पहायची इच्छा होईल.. मी स्वतः सात ते आठ वेळा पाहिलं आहे.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, “लोक आधी खूप अशा नाटकांचे प्रयोग करतात आणि मग चित्रपटांमध्ये येतात, आपण तर आज पहिलं नाटकं पाहिलं.”
रिंकूने शेअर केलेल्या या पोस्टवरून तिला नेटकऱ्यानी चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळतंय. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे लेखन दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केलं आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.