बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने तीन वर्षांपूर्वी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अनेक आरोपांना सामोरं जावं लागलं. तिच्यावर अनेक टीका झाली, पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. परिणामी तिला काही दिवस तुरुंगात देखील जावं लागलं. याकाळात रियाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आता तब्बल तीन वर्षांनी रियाने यादरम्यान आलेला अनुभव सांगताना यावर भाष्य केलं आहे. (Rhea Chakraborty on Sushant Singh Rajput Death)
‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३’ या कार्यक्रमात रियाने हजेरी लावली. यावेळी दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक गोष्टींचा उलगडा करताना सुशांतच्या आत्महत्येनंतर तिच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि तुरुंगातील अनुभवाबद्दल प्रथमच बोलली आहे. यावेळी रिया म्हणाली, “जेव्हा मी लोकांच्या चेहऱ्याकडे पाहते, तेव्हा काही लोक माझ्याकडे असं पाहतात, जसं मी काहीतरी केलं आहे. मी लोकांचे चेहरे वाचू शकते. लोक मला ‘चुडैल'(हडळ) म्हणायचे. त्या काळात हडळ कोण होती, ते माहिती आहे ? तर हडळ अशी स्त्री होती, जी पुरुषप्रधान समाजाच्या मतांवर विश्वास ठेवत नव्हती तर त्या मतांच्या विरोधात होती. त्यामुळे ते मला आवडलं आणि त्याने मला काही फरक पडला नाही. कोणास ठाऊक, कदाचित मला काली जादू माहित असेल.”
हे देखील वाचा – ‘बॉईज ४’चं लंडनमध्ये चित्रीकरण झालं पण निखिल बनेला नेलं नाही, अभिनेत्याची खंत, म्हणाला, “वाईट वाटतं पण…”
“लोक म्हणतात की, जर लग्नानंतर पुरुष जास्त दारू पिऊ लागला तर हे सर्व त्याच्या पत्नीच्या येण्याने झाले. त्याच्या करिअरला उतरती कळा लागली, तर त्यासाठीही तिलाच जबाबदार धरलं जातं.”, असंदेखील रिया म्हणाली. त्याचबरोबर तिने तिच्या तुरुंगातील प्रवासाबद्दल खूप काही बोलली आहे. तिच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – भीषण कार अपघातानंतर ‘स्वदेस’ फेम गायत्री जोशीची झाली होती अशी अवस्था, अभिनेत्रीच्या पतीची पोलिस चौकशी होणार
ज्यावेळेस सुशांतने आत्महत्या केली होती, त्यावेळी तो आणि रिया एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येसाठी तिलाच जबाबदार ठरवण्यात आलं होतं. शिवाय सोशल मीडियावरही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होता. या घटनेनंतर रिया एकही चित्रपटात दिसली नाही. मात्र, ती ‘रोडिज’ या टीव्ही शोमध्ये आपल्याला दिसत आहे.