एखादा कलाकार कोणताही वारसा नसताना सौंदर्याच्या आणि अभिनय शैलीच्या जोरावर अनेक कलाकार मंडळींनी सिनेमाविश्वत आपलं स्थान भक्कम केलं. यांत एक नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे रिमा लागू. मराठी हिंदी सिनेमाविश्वात काम करणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने साऱ्यांना भुरळ घातली. प्रत्येक कलाकाराची एक भूमिका असते, वा त्या भूमिकेसाठी ती व्यक्ती ओळखली जाते. रिमा लागू यांची प्रत्येक चित्रपटात, मालिकेत आईची भूमिका ठरलेली असायची.(Reema lagoo story)
‘मैने प्यार किया’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले’, ‘हम साथ साथ है’, ‘कल हो ना हो’ या चित्रपटातून रिमा लागू यांनी आपल्या बहिणयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. रिमा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही रंगमंचापासून केली. त्यानंतर त्यांनी आपली पावलं मराठी सिनेसृष्टीकडे वळविली. मराठी सिनेविश्वासोबत रिमा लागू यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपला दबदबा तयार केला.
पाहा रिमा लागू यांच्या मृत्यूदरम्यानचा हा किस्सा (Reema lagoo story)
मराठी मनोरंजन विश्वासोबत बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्रींनपैकी एक अभिनेत्री म्हणजे रीमा लागू. आज दिनांक १८ मे रोजी रीमा लागू यांची पुण्यतिथी आहे. चला तर जाणून घेऊया रिमा लागू यांच्याबद्दलच्या किस्स्याबद्दल जपलं ते आपलं मध्ये. अभिनेत्री रिमा लागू या त्यांच्या मृत्यूपूर्वी काही तासांपर्यंत शूटिंग करत होत्या. शूटिंगनंतर त्या घरी गेल्या आणि मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काम केलं, आणि आपल्या अभिनयाची आवड जोपासली.(Reema lagoo story)
हे देखील वाचा – धकधक गर्ल माधुरीशी होतेय अमृताची तुलना, चाहतीने कमेंट करत केलं कौतुक
रिमा लागू यांनी त्यांच्या करिअरमध्ये ९५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज भलेही रिमा आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या दमदार अभिनयाने त्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत हे मात्र नक्की.