कलाकार आणि त्याच फोटोशूट यांच्या चांगल्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. (Amruta Khanvilkar Photoshoot)
चाहतेही कलाकारांच्या या फोटोशूटवर तसेच कलाकारांवर भरभरून प्रेम करतात. बरेचदा काही नेटकऱ्यांच्या तावडीत सापडून हे कलाकार ट्रोल ही होतात.
अशातच सहज सुंदरतेमुळे मोहन घालणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जाणार म्हणजे अमृता खानविलकर. तिच्या अदाकारीने अनेक चाहत्यांना तिने घायाळ केले आहेच. (Amruta Khanvilkar Photoshoot)
अशातच पुन्हा एकदा भुरळ घालणार असं फोटोशूट अमृताने केलं आहे, तिने सोशल मीडियावर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
मराठमोळ्या अमृताचा नवा लूक या तिच्या फोटोशूटमध्ये पाहायला मिळतोय. (Amruta Khanvilkar Photoshoot)
मुस्लिम लूक केलेलं हे नवंकोरं फोटोशूट अमृताने सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. यात तिच्या नजाकती पाहणं रंजक ठरतंय.
विशेष म्हणजे तिच्या फोटोवरुन नजर हटत नसली तरी तिच्या या फोटोंवरील एका चाहत्यांच्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे. (Amruta Khanvilkar Photoshoot)
माधुरी दीक्षित सारखी दिसतेयस अशी कमेंट चाहतीने केली आहे. तर अनेक चाहत्यांनी अमृताच्या या फोटशूटला पसंती दर्शविली आहे.