सुखात मागे उभा असतो, दुःखात नेहमी पुढे आयुष्यातील अशा व्यक्तीला मित्र म्हणतात. खऱ्या आयुष्यतील मैत्री आणि रुपेरीपडद्यावर दिसणारी मैत्री ह्यात फरक असतो. पण मैत्रीच्या या दुनियादारीत एक जोडी अशी आहे जी पडद्यावरच्या मैत्री सोबतच खऱ्या आयुष्यातील मैत्रीसाठी आजही ओळखली जाते. या जोडीतील एक मित्र आज हयात नसला तरीही त्यांची मैत्री आजही तेवढीच लोकप्रिय आहे. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी म्हणजे अभिनेते महेश कोठारे आणि स्वर्गीय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.(Laxmikant Berde Sacrifice)
या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. याच किस्स्यांमधला एक असा किस्सा ज्यात महेश कोठारे यांच्या मनात चालू असलेली चलबिचल लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लगेच ओळखली आणि महेश कोठारेंच्या शंकेचं निराकरण केलं. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे हा किस्सा इट्स मज्जा च्या जपलं ते आपलं या भागात.
महेश कोठारेंच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी धडाकेबाज या चित्रपटाचं शूटिंग सुरु होत. आणि नेहमीप्रमाणे महेश यांच्या याही चित्रपटात लक्ष्मीकांत हे मुख्य भूमिकेत होतेच पण या वेळी एक समस्या अशी होती कि संध्याकाळ पूर्वी लक्ष्मीकांत यांना शूटिंग मधून मोकळं करण्याचं मोठं काम होत कारण त्या वेळी लक्ष्मीकांत याना ‘ मैने प्यार किया हा चित्रपट मिळाला होता त्यासाठी त्यांचं मुंबईला जाणं आवश्यक होत.’
पण नेमकं त्याच दिवशी सेटवर लाईट गेली आणि शूटिंगला उशीर झाला. त्यामुळे महेश कोठारे यांच्या मनात लक्ष्याला फ्री कस करणार याची घालमेल सुरु झाली आणि त्यांना वाटू लागलं आता शूटिंग लांबणार याच टेन्शन मध्ये असताना लक्ष्मीकांत यांनी महेश कोठारे यांना पाहिलं आणि त्यांच्या जवळ जाऊन ते महेश कोठारे यांना म्हणाले ‘ महेश, खूप टेन्शन मध्ये दिसतोयस तू, पण काळजी नको करुस अन्य कुठलाही चित्रपट असो ‘सारी दुनिया एक तरफ, महेश कोठारे माझ्या साठी एक तरफ! तुझा चित्रपट पूर्ण करुनच मी मुंबईला जाणार.(Laxmikant Berde Sacrifice)
महेश आणि लक्ष्या हे नाव मैत्री साठो आज ही का ओळखलं जात याच एक उत्तम उदाहरण म्हणजे महेश कोठारे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेला हा किस्सा.