शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “स्वतःमध्ये बदल केलेस आणि प्रेमासाठी…”, रश्मी देसाईचा अंकिता लोखंडेला पाठिंबा, सासूलाही सुनावलं, म्हणाली, “तुम्ही बाहेर येऊन ‘बिग बॉस’…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress rashami desai supported ankita lokhande and bashes on vicky jain mother said do not play bigg boss outside

"स्वतःमध्ये बदल केलेस आणि प्रेमासाठी…", रश्मी देसाईचा अंकिता लोखंडेला पाठिंबा, सासूलाही सुनावलं, म्हणाली, "तुम्ही बाहेर येऊन 'बिग बॉस'…"

छोट्या पडद्यावरील नेहमीच चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व चांगलेच गाजले. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाची थीम ही जोडप्यांवर आधारित होती. या शोमधील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चांगलीच गाजली. अशातच येत्या ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्यामध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. कलर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले असून यावेळी अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी त्याचबरोबर भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले.(Rashami Desai Supported Ankita Lokhande)  

या ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्याचे शूटिंग पार पडले असून अंकिता व विकीच्या आई या शोमधून परतल्या आहेत. दरम्यान, विकीची आई रंजना जैन यांनी अनेक वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. ज्याद्वारे त्यांनी अंकितावर निशाणा साधला आहे. रंजना जैन यांनी अंकिताबद्दलच्या केलेल्या अनेक व्यक्तव्यांमुळे सोशल मीडियावर त्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. अशातच अंकिताची मैत्रीण व टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने अंकिताच्या समर्थनार्थ एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “स्वतःच्या प्रगतीकडे…”

रश्मी देसाईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अंकिताबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर अभिनेत्रीने अंकितावर प्रेमाचा वर्षाव करत असे म्हटले  आहे की, “तू जशी आहेस तशीच राहा आणि तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. तू स्वतःमध्ये खूप बदल केले आहेस आणि हे बदल तू फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या प्रेमासाठी केले आहेस. तु ज्याच्यावर प्रेम करतेस त्याच्यासाठी केले आहेस. आजवर तू जे जे कमावले आहेस ते फक्त तुझ्या मेहनतीने कमावले आहेस. तू तुझा बिनधास्त व बेधडक स्वभाव नेहमीच जपला पाहिजेस.”

आणखी वाचा – येत्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहता येणार ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी

यापुढे रश्मीने अंकिताच्या सासूबद्दल असे म्हटले की, “मला माहित आहे काकी (अंकीताची सासू) तुम्हाला कदाचित वाईट वाटेल. पण ते दोघे माझे चांगले मित्र आहेत आणि ते ‘बिग बॉस’चा एक भाग आहेत. तुम्ही नाही. त्यामुळे कृपया बाहेर येऊन तुम्ही वेगळा ‘बिग बॉस’ खेळू नका. अजून खूप आयुष्य बाकी आहे.” दरम्यान, अंकिताच्या सासूने तिच्यावर केलेल्या आरोपांमुळे विकी जैनच्या आईवर अनेक माध्यमांधून प्रतिक्रिया येत आहेत.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17bigg boss newsbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsrashami desaivicky jainअंकिता लोखंडेबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस बातमीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनबॉलीवूड बातमीमनोरंजन बातमीरश्मी देसाईविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
marathi actor hardeek joshi emotional in his sister in law in jau bai gavaat show see the video

"नशिबाचा खेळ असा की...", शेवटच्या दिवसांमध्ये हार्दिक जोशीने वहिनीला 'ते' वचन दिलं अन्...; रडत म्हणाला, "माझ्या भावाची..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.