आपल्या निखळ सौंदर्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मराठी मालिका, चित्रपट अशा अनेक माध्यमातून अभिनय साकारून प्रेक्षकांचं मानोरंजन केलं आहे. याशिवाय प्राजक्ता सर्वात जास्त लोकप्रिय ठरते ते हास्यजत्रातील तिच्या निवेदकाच्या भूमिकेमुळे. प्राजक्ताने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. तिने मालिका, चित्रपट, वेबसीरिज यात वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकल.(Prajakta Mali Birthday Gift)
सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. मागील बऱ्याच काळापासून प्राजक्ता हास्यजत्रेच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. हास्यविरांच्या कले एवढेच प्रेक्षक प्राजक्ताच्या भूमिकेचेही फॅन आहे आहेत.
हे देखील वाचा – “Happy Birthday Aai …” नम्रता संभेरावला लेकाने दिलं स्वकष्टाने बनवलेलं गिफ्ट, गिफ्ट पाहून म्हणाली, “या दिवसाची…”
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा वाढदीवस प्रेक्षकांनी साजरा केला. परंतु वाढदिवसाच्या अनेक दिवसानंतर हास्यजत्रेतील मंडळींनी प्राजक्ताला खास भेटवस्तू दिली आहे. अभिनेता रोहित माने, ओंकार राऊत अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, रसिक वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य कलाकारांनी प्राजक्ताला एक सुंदर भेटवस्तू दिली. त्या बद्दल प्राजक्ताने एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत.
हास्यजत्रेच्या कुटुंबाकडून मिळालेल्या गिफ्टने प्राजक्ता भारावलेली पाहायला मिळाली. प्राजक्ताला मिळालेल्या भेटवस्तूवर प्राजक्ताच्या एका फोटोसह अन्य काही कलाकृती आहेत. भेटवस्तू पाहताना “मी हे नवीन फार्महाउस वर ठेवणार” असं म्हणताना देखील प्राजक्ता दिसत आहे.(maharashtrachi hasya jatra cast)