अभिनेत्री राखी सावंत रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण, गेल्या काही दिवसांपासून ती जास्तच चर्चेत आलेली आहे. त्याचे कारण आहे, राखीचा पूर्व पती आदिल खान व तिच्या मैत्रिणीने राखीवर लावलेले आरोप. राखी सावंतने आदिलवर गंभीर आरोप केल्याप्रकरणी त्याला तुरुंगात जावं लागलं. मात्र आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिल खान पापाराझींना सतत मुलाखती देत आहे. त्यात तो राखीबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा करत आहे. शिवाय, राखीची मैत्रिणीनेही तिच्यावर गंभीर आरोप करत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Rakhi Sawant Instagram Account Hacked)
एकीकडे अभिनेत्री राखी सावंत उमराहसाठी सौदी अरेबियाला निघाली आहे. तर दुसरीकडे, तिचा पूर्व पती आदिल खान आणि तिची मैत्रीण राजश्री हिने तिच्यावर अनेक आरोप केले आहे. अशातच याप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. अभिनेत्री राखी सावंतचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. त्याची माहिती खुद्द तिनेच दिली असून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हे देखील वाचा – फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने केस का कापले?, स्वतःच सांगितलं कारण, म्हणाला, “त्यावेळी रडलो पण…”
दरम्यान, यावर बोलताना राखीने तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यामागे आदिल खान व तिची मैत्रीण राजश्रीचा हात असल्याचे तिने पापाराझींना सांगितले. शिवाय तिने हेदेखील सांगितले की, या अकाऊंटचे अक्सेस माझ्याकडे नाही. या दोघांनी माझे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले आहे, ते मला जेवू देत नाहीत किंवा झोपू देत नाहीत. जेव्हा मी घरी किंवा कुठे बाहेर जाते, तेव्हा ते सतत माझा पाठलाग करतात, असं राखी म्हणाली. याप्रकरणी राखीने या दोघांविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे देखील वाचा – राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही म्हणून अनुपम खेर यांचा संताप, ट्वीट करत म्हणाले, “माझ्या अभिनयासाठी मला…”
अभिनेत्री राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने २०२२ मध्ये लग्न केले होते. पण ८ महिन्यांनी तिने या लग्नाच्या माहिती सर्वांसमोर शेअर केली. पण काही दिवसात राखीने पती आदिलवर गंभीर आरोप लावले होते, त्यामुळे तो अनेक महिने तुरुंगात होता. मात्र, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आदिलने राखीवर अनेक आरोप लावले आहेत. शिवाय तिच्या मैत्रीण राजश्रीनेही तिच्यावर गंभीर आरोप करत याबद्दलचा अधिक खुलासा करणार असल्याचे तिने सांगितले आहे. (Rakhi Sawant Instagram Account Hacked)