शुक्रवार, मार्च 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने केस का कापले?, स्वतःच सांगितलं कारण, म्हणाला, “त्यावेळी रडलो पण…”

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 25, 2023 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gaurav More About His New Hairstyle

Gaurav More About His New Hairstyle

Gaurav More About His New Hairstyle ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार घरोघरी पोहोचले.’हास्यजत्रेने’ एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. प्रसिद्धी मिळाली.त्यात ‘हास्यजत्रा’ हे नाव निघालं की फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजेच गौरव मोरे आवर्जून आठवतो.गौरवला विनोदाच्या कमाल टायमिंगमुळे प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळतं आहे.(Gaurav More About His New Hairstyle)

काही कलाकारांची त्यांची अशी एक विशिष्ट स्टाईल असते. कपडे,हेअरस्टाईल किंवा अभिनयाची स्टाईल असेल आणि ते कलाकार त्यांच्या कामासोबतच त्यांच्या त्या स्टाइलसाठी देखील प्रसिद्ध असतात. या स्टाईल असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आता गौरव मोरेच नाव देखील नक्कीच घेतलं जात. गौरव त्याच्या विनोदीशैलीमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या हेअरस्टाइलसाठी देखील ओळखला जातो.त्याचे मानेपर्यंत वाढवलेले केस ही गौरवची खास ओळख होती. तो ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असं म्हणत एन्ट्री घ्यायचा आणि ही एन्ट्री त्याच्या केसांच्या स्टाइलमुळेच हिट ठरायची.

पाहा काय म्हणाला गौरव मोरे? (Gaurav More About His New Hairstyle)

परंतु सध्या गौरवाचा नवीन लूक प्रेक्षकांसमोर आला.गौरव ‘अंकुश’ या आगामी मराठी चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक व टिझर लाँच सोहळा पार पडला.या निमित्त इट्स मज्जा सोबत सवांद साधताना गौरवने त्याने केस का कापले व केस कापताना त्याला किती त्रास झाला या बदल भाष्य केले आहे.गौरव म्हणाला “आता माझी जी हेअरस्टाईल आहे तसे कॉलेज मध्ये असताना माझे केस होते. पंरतु आता मला कानावर येणाऱ्या केसांची सवय झाली आहे. असं असलं तरीही मी म्हणालो होतो, जर चांगला सिनेमा असेल किंवा चांगली भूमिका असेल आणि त्यासाठी केस कापावे लागले तर मी ते करेन सध्या मी ‘परिनिर्वाण’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे आणि त्या भूमिकेची गरज म्हणूनच मी केस कापले आहेत.”

हे देखील वाचा: ‘अंकुश’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, गौरव मोरेचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ

त्याचसोबत गौरव असं देखील म्हणाला, “केस कापताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होत. मी तो व्हिडिओ देखील शूट केला आहे.” त्याचसोबत ‘अंकुश’, ‘परिनिर्वाण’ या चित्रपटांसोबत ‘सांगी’ या सिनेमात देखील गौरव पाहायला मिळणार आहे.अनेक नवीन भूमिकांमध्ये गौरव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच केस कापल्यानंतर समीर चौघुलेंनीदेखील गौरवसाठी खास पोस्ट शेअर केली होती.(gaurav more new movies)

Tags: gaurav more
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Tejaswini Pandit Presence In Navaratri Festival
Entertainment

लोअर परळमध्ये ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला तेजस्विनी पंडित यांची उपस्थिती; भक्तिभावनेने केली सुरुवात

मार्च 26, 2026 | 3:24 pm
Sonali Kulkarni Dance in Salbardi
Entertainment

‘सालबर्डी’मधील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज; ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’

मार्च 26, 2026 | 3:00 pm
Sadhi Manas Serial Off Air
Entertainment

२ वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप, सेटवर साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस; कलाकारांसह प्रेक्षक ही नाराज

मार्च 26, 2026 | 11:16 am
kunickaa sadanand slams ai generated pic
Entertainment

“लाज वाटली पाहिजे, तो माणूस विवाहित आहे”, कुमार सानूबरोबरचे AI फोटो पाहून कुनिका सदानंद भडकली, मानहानीचा केला दावा

मार्च 25, 2026 | 1:30 pm
Next Post
gaurav more prasad oak new movie

गौरव मोरेच्या हाती मोठा मराठी चित्रपट, प्रसाद ओकबरोबर काम करताना दिसणार, म्हणाला, "लवकरच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.