शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं पहिलंच लग्न”, राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने लग्नानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “अल्लाहच्या आशीर्वादाने…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 8, 2024 | 10:46 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
adil khan durrani on marriage

“माझं पहिलंच लग्न”, राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने लग्नानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “अल्लाहच्या आशीर्वादाने...”

बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान हे दोघंही नेहमी चर्चेत असतात. गेल्या वर्षी राखी व आदिलच्या लग्नामुळे आणि त्यानंतर त्यांच्या घटस्फोटामुळे अधिक प्रकाशझोतात आले. अशातच काही दिवसांपूर्वी आदिलने गुपचुप दुसरे लग्न केल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आदिलने आता स्वतः होतो शेअर करत लग्न केल्याची कबुली दिली आहे.सध्या इन्स्टाग्रामवर आदिल व त्याची पत्नी सोमी खान यांचे फोटो व्हायरल होत आहेत. (adil khan durrani on marriage )

राखी व आदिलच्या चर्चा नेहमी माध्यमांमध्ये होत असतात. राखीने आदिलबरोबर लग्न केल्यानंतर काही दिवसांमध्येच दोघांमध्ये वाद सुरू झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या होत्या. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले होते ज्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले होते. कालांतराने तो तुरुंगातून बाहेर आला आणि त्याने राखीवरही अनेक गंभीर आरोप केले. राखीचे सर्व आरोप त्याने फेटाळून लावले. पण नंतर त्याने पुन्हा लग्न केळ्याकया चर्चा  सुरू झाल्या. लग्नावर त्याने मौन सोडले आहे.

आणखी वाचा – राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल, ‘या’ ठिकाणी पार पडला विवाह सोहळा

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

आदिलने जयपूर येथे अभिनेत्री सोमी खानबरोबर लग्न केले. त्याने याबद्दल माध्यमाशी बोलताना सांगितले की, “हे माझं पहिलं लग्न आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी सर्व माहिती देईन”. तसेच तो म्हणाला की, “आम्ही आता बंगळुरूमध्ये आहोत आणि शुक्रवारी मुंबईमध्ये येऊ. तसेच मी लवकरच सर्व सविस्तर स्पष्ट करेन.”

आणखी वाचा – अंबानी कुटुंबियांना इतका मिळाला आहेर, बॉलिवूड कलाकार आहेरात काय घेऊन गेले?, माहिती समोर

याबरोबरच त्याने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “आम्हाला खूप आनंद होत आहे की अल्लाहच्या आशिर्वादने आम्ही साध्या व सुंदर पद्धतीने लग्न केले आहे. मी माझ्या कुटुंबाचे व मित्रपरिवाराचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला.आम्ही पती-पत्नीच्या रुपात आमचा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आमचे नवीन आयुष्य सुखाचे असेल असा आम्हाला आशीर्वाद द्या”.

सूत्रांच्या माहितीनुसार दोघांनी २ मार्च २०२४ रोजी जायपूर येथे लग्न केले. आदिलची पत्नी सोमी खान तिची बहीण सबा खान बरोबर ‘बिग बॉस १२’ मध्ये दिसून आली होती.

Tags: Adil Khan Durraniadil khan durrani second marriagedivorcerakhi and adil weddingrakhi sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Aaipan Bhari Deva Movie

'बाईपण…' नंतर 'आईपण…' ठरणार भारी! केदार शिंदे यांची मोठी घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.