बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखी सावंतच्या पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल, ‘या’ ठिकाणी पार पडला विवाह सोहळा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 8, 2024 | 8:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adil Khan Durrani Somi Khan Wedding

Adil Khan Durrani Somi Khan Wedding

‘बिग बॉस’ हा लोकप्रिय कार्यक्रम आपल्या हटके अंदाजाने गाजवणारी राखी सावंत आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहेत. आधी राखी-आदिलने लग्न केल्याच्या चर्चांवरून, त्या नंतर घटस्फोटाच्या चर्चांवरून तर काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे ही जोडी प्रकाशझोतात राहिली. राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीने दुसरं लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले होते परंतु आता हा खरचं आदिल खानने दुसरं लग्न केल्याचं स्पष्ट झाले आहे. (Adil Khan Durrani Somi Khan Wedding)

आदिल खानने ‘बिग बॉस १२’ या मध्ये झळकलेल्या स्पर्धकाशी लग्न केले असून या स्पर्धकाचे नाव सोमी खान असे आहे. जयपूर येथे या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला असून या दोघांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आदिल खान-राखी सावंत २०२२ साली विवाह बंधनात अडकले परंतु आपापसात झालेल्या वादविवादामुळे दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांपूर्वी राखी ने आदिलवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे आदिलला तुरुंगात देखील जावे लागले होते.(rakhi sawant adil khan durrani)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा- अंबानी कुटुंबियांना इतका मिळाला आहेर, बॉलिवूड कलाकार आहेरात काय घेऊन गेले?, माहिती समोर

आदिल खानच्या दुसऱ्या लग्नानंतर आता राखीची काय प्रतिक्रिया असणार याकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे. राखी तिच्या विचित्र अंदाजाने रील्स, व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. राखी आदिलसाठी ही आता एखाद रील शेअर करणारं हे देखील पाहण्यासाठी राखीचे चाहते उत्सुक दिसत आहेत. राखीच्या चाहत्यांनी व्हायरल फोटोंवर प्रतिक्रिया देत यावर आता एखादं रिल होऊन जाऊदे राखी अशा आशयाच्या कमेंट्स केलेल्या आहेत.(Adil Khan Durrani Somi Khan Wedding)

आणखी वाचा- “अंबानींच्या पार्टीत नाचलास मग स्वतःच्या लेकीच्या लग्नात का नाही?”, आमिर खान म्हणाला, “नाचलो कारण…”

आदिल खानने लग्न केलेली सोमी खान ही ‘बिग बॉस’ हिंदीच्या १२ व्या सीझनमध्ये झळकली होती. सोमी खान ही मूळ राजस्थानची आहे. सध्या सोमी कामाच्या निमित्ताने मुंबईमध्ये राहते असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी ‘न्याय:द जस्टीस’, ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्थान’ या कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलं आहे. आदिल व सोमी देखील अनेक पार्टीमध्ये एकत्र पाहिले गेले होते. तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती असे सांगण्यात येत आहे.

Tags: aadil khan duraniadil khan somi khan weddingadil second marriagerakhi sawantsomi khan
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Next Post
Dolly Sohi And Sister Amandeep Sohi Death

Dolly Sohi Died : सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, काही तासांपूर्वीच बहिणीचाही झाला होता मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.