शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बाईपण…’ नंतर ‘आईपण…’ ठरणार भारी! केदार शिंदे यांची मोठी घोषणा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 8, 2024 | 10:48 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Aaipan Bhari Deva Movie

Aaipan Bhari Deva Movie

मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस आणणारा चित्रपट म्हणून सर्वात जास्त नावाजला गेलेला चित्रपट म्हणजे ‘बाईपण भारी देवा’. स्त्रियांच्या आयुष्यातील चढउतार यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी ‘आईपण भारी देवा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्या आयुष्यातील आईच्या अनन्य साधारण महत्वाला अधोरेखित करणारा हा चित्रपट येत्या २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. (Aaipan Bhari Deva Movie)

चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वरुन चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे. केदार शिंदे यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय “प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’”. महिला दिनाचे औचित्य साधत केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. केदार यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

आणखी वाचा

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात अभिनेत्री सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, दीपा परब यासह इतर कलाकारांनी आपल्या सुंदर अभियाने चित्रपटाच्या यशाचा पाया रचला. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात स्त्रियांच्या आयुष्यातील अडचणी, चढ-उतार मांडल्यानंतर आता ‘आईपण भारी देवा’ या चित्रपट सज्ज झाला आहे आयुष्यतील आईचं महत्व सांगण्यासाठी.

‘आईपण भारी देवा’ या चित्रपट नक्की कोण कोण कलाकार दिसणार या बाबत प्रेक्षक उत्सुक दिसत आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करत असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ज्योती शिंदे, बेला शिंदे यांनी सांभाळली आहे. तसेच चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक – ओंकार दत्त यांनी केले असल्याचं समजतंय. केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अन्य कलाकारांनी देखील केदार यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: aaipan bhari devabaipan bhari devakedar shindemarathi movienew marathi movie
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Adil Khan Durrani Wife

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीने केलं दुसरं लग्न, त्याची बायको नेमकं काय करते?, अभिनयक्षेत्राशी खास कनेक्शन अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.