सिनेसृष्टीमध्ये येणं तिथे टिकून राहणं हा प्रवास सोपा नसतो. प्रेक्षकांचं मन जिंकणं म्हणजे जग जिकंण्यासारखं आहे.आणि आपले लाडके कलाकार प्रेक्षकांच्या प्रेमासाठी, सातत्याने त्यांचं मनोरंजन करण्यासाठी दिवस रात्र एक करत असतात. अशी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून प्रार्थनाने पदार्पण केले आणि तिच्या अभिनयाने, सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली.(Prarthana Behere Career)
बघता बघता प्रार्थनाला सिनेसृष्टीमध्ये येऊन १४ वर्ष पूर्ण होणार आहेत. हिंदी तसेच मराठी सिनेविश्वात प्रार्थनाने तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या प्रार्थना तिच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील कलाकारांची ऑफस्क्रीन बॉण्डिंग कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असेल तरी प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी ती एक आहे. आणि प्रार्थनाला सिनेविश्वात १४ वर्ष पूर्ण होणार असल्याचं औचित्य साधून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या टीमने प्रार्थनाला तिच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवून सरप्राईज दिले.
पाहा रेशीमगाठच्या टीमने काय दिलं सरप्राईज?(Prarthana Behere Career)
नेहा आणि शेफालीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले शेफाली म्हणजे अभिनेत्री काजल काते म्हणाली, कि तुझ्या १४ वर्षाच्या प्रवासात ही मागची २ वर्ष मीही तुझ्या सोबत होते याचा मला आनंद आहे.सिनेसृष्टीत यायच्या आधी तुझ्या बदल खूप काही ऐकलं होत, एकदा काजलने नागपूरला जाणाऱ्या विमानात प्रार्थनाला पहिले होते आणि तेव्हाच तिने ठरवलं होत की एकदा तरी हिच्या सोबत काम करायचं आहे. आणि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या निमित्ताने तो योग जुळून आला.माझं तुझ्या वर खूप प्रेम आहे. आणि तुझ्या पुढच्या १४ वर्षांसाठी ही तुला खूप शुभेच्छा.(Prarthana Behere Career)
हे देखील वाचा : प्रेक्षकांच्या मागणीमुळे पुन्हा सुरू होणार मालिका?
शेफाली सोबतच मालिकेत खलनायिका असणारी सिमी काकू, मीनाक्षी वहिनी यांनीही प्रार्थनाचं भरभरून कौतुक केलं.मीनाक्षी वहिनी म्हणजे अभिनेत्री स्वाती देवलने तिच्या अभिनयासोबत तिच्या मध्ये असणारे विविध गुण देखील प्रेक्षकांना सांगिले. ती उत्तम चित्रकार आहे, कुक आहे, फॅशन डिज़ाइनर आहे त्यासोबत फार छान असं गुजराती ती बोलते.कलाकारांचा हा व्हिडिओ प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.