बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आपचे नेते राघव चड्ढा हे रविवारी उद्यपूरमधये विवाहबंधनात अडकले. लीला पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य व जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात आलं होतं. या शाही विवाहसोहळ्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. मोठ्या थाटामाटात हा लग्नसोहळा संपन्न झाला. या खास क्षणांचे फोटो परिणीती व राघव यांनी सोशल मीडियावर शेअर केले. (Parineeti chopra flaunts her mangalsutra)
त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नातील लूकपासून ते लग्नातील थाटपर्यंतची चर्चा सुरु झाली आहे. लग्नात या जोडप्याने कपल डान्सही केलेला पाहायला मिळाला याचाही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. पण सध्या विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे परिणीतच्या मंगळसूत्राची.
#WATCH | Newlywed couple AAP MP Raghav Chadha and actor Parineeti Chopra arrive in Delhi. pic.twitter.com/zpWHYrh2zg
— ANI (@ANI) September 25, 2023
या विवाहसोहळ्यानंतर परिणीती-राघव दिल्लीत पोहोचले. लग्नानंतर परिणीती पहिल्यांदा सासरी जाणार आहे. या जोडप्याला दिल्लीतील विमानतळावर पाहण्यात आलं. परिणीती यावेळी नियॉन रंगाचा ड्रेस, हातात चुडा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपारिक लूकमध्ये दिसली. त्याच्यासह राघवसुद्धा छान पेहरावात पाहायला मिळाला.
दिल्ली विमानतळावरील या नवविवाहित जोडप्यांचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिणीतीच्या लूकने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंच आहे पण तिने घातलेलं मंगळसूत्र विशेष लक्षवेधी ठरलं आहे. तिच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते. परिणीतीच्या मंगळसूत्रात इन्फिनिटी हे चिन्ह पाहायला मिळालं. त्या इन्फिनिटी चिन्हाच्या मध्यभागी गोलाकार हिरा डिझाईन केलेला पहायला मिळाला. तिच्या या साध्या लूकने व हटके मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नानंतर लवकरच हे जोडपं मित्रमंडळींना दिल्लीत व मुंबईमध्येही रिसेप्शन पार्टी देणार आहेत. यावेळी बॉलिवूडमधील बरीच कालाकार मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.