‘बिग बॉस १५’ या शोमधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला हिंदी टीव्ही अभिनेता करण कुंद्रा विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसह तो अनेक ठिकाणी स्पॉट झाल्याच्या बातम्या अनेकदा आपल्या ऐकण्यात येतात. त्याचबरोबर तो त्याच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आला. करण लवकरच ‘थैंक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अशातच त्याने आता आणखी एक आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. (Karan Kundra buys a new Home)
अभिनेता करण कुंद्राने मुंबईच्या वांद्रे येथील आलिशान घरात गृहप्रवेश केला असून नुकतंच त्याने या नव्या घराची पूजा केली. करणने गेल्यावर्षी हे घर खरेदी केलं होतं. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर तो या घरात शिफ्ट झाला आहे. दरम्यान, करणने इन्स्टाग्राम स्टोरीजद्वारे त्याच्या नव्या घरातील पूजेचे फोटोज शेअर केले. या फोटोजमध्ये पारंपरिक वेषभूषेमध्ये असलेला करण त्याच्या घराची पूजा करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – वाट चुकलेल्या श्रेयस तळपदेला देवानेच दाखवला रस्ता, पोस्ट शेअर करत म्हणाला, “कोणत्या रुपामध्ये देव…”
करणने वांद्रे येथील समुद्र किनाऱ्यालगत हे आलिशान घर खरेदी केलं आहे. या नव्या घरात लिविंग रूम, बेडरूम, किचन तर आहेच. शिवाय प्रायव्हेट लिफ्ट आणि स्विमिंग पूलदेखील अभिनेत्याच्या आलिशान घरात आहे. करणच्या घरामधून समुद्राच्या समोरचे सुंदर दृश्य दिसत आहे. अभिनेत्याच्या या आलिशान घराची किंमत तब्बल २० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे त्याच्या नव्या घराच्या गृह्प्रवेशावेळी त्याचे कुटुंबीय उपस्थित असताना गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश दिसत नसल्यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहे.
???????????? ????????????????????????????????????????, ???????????? ????????????????????????????????, ???????????? ????????????????. ???????????????????????????????????????????????????????????? ???????????????????? !
— ???????????????????????? ???????????????????????????????????? (@TejRanOfficials) September 25, 2023
May your dream home be always filled with joy, peace, happiness and endless love. Happy housewarming ❤️????#KaranKundrra #TejRan #TejRanFam pic.twitter.com/T92gQsqB6c
हे देखील वाचा – नियॉन रंगाचा ड्रेस, हातात बांगड्या अन्…; थाटात सासरी पोहोचली परिणीती चोप्रा, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच तो ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटात झळकणार आहे. करण व्यतिरिक्त भूमी पेडणेकर, शहनाज गिल, अनिल कपूर व अन्य कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर त्याने काही दिवसांपूर्वी ‘तेरे इश्क में घायल’ या शोचं शूटिंग पूर्ण केली असून ज्यामध्ये मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीसुद्धा असणार आहे.