सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘डॉन ३’मध्ये शाहरुख खान का नाही?, अखेर मिळालं उत्तर, फरहान अख्तरचा मोठा खुलासा, म्हणाला, “दोघंही वेगळे झालो कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 23, 2023 | 3:07 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Farhan Akhtar said why he replace shah rukh

Farhan Akhtar said why he replace shah rukh

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. २०२३ हे वर्षसुद्धा त्याच्यासाठी बरेच महत्त्वाचे ठरले आहे. कारण यावर्षी त्याच्या दोन मोठ्या चित्रपटांनी ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो चित्रपट क्षेत्रातील सूपरस्टार का आहे! त्याचे ‘जवान’ व ‘पठाण’ चित्रपट प्रचंड गाजले. त्यांनी बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली. पण यासगळ्यात त्याच्या हातून एक मोठ्या चित्रपटाची संधी हातातून निसटली. तो चित्रपट म्हणजे ‘डॉन ३’. (Farhan Akhtar said why he replace shah rukh)

७०च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अमिताभ डॉनची भूमिका साकारली होती. तसंच ते या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसले होते. २००६ मध्ये शाहरुखने याच चित्रपटाचा रिमेक आणला. तेव्हा त्याला या चित्रपटासाठी बराच विरोध झाला होता. पण त्याने आपल्या शानदार अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटानंतर तो बॉलिवूडचा नवा डॉन म्हणून ओळखला जाऊ लागला.

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

आणखी वाचा – Parineeti Chopra Raghav Chadha Wedding राघव चड्ढाची लग्नमंडपात होणार ग्रँड एण्ट्री, लाखो रुपयांचा खर्च, लग्नापूर्वीच्या विधींसाठी नटली परिणीती चोप्रा

‘डॉन’ चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये शाहरुख सुपरहिट ठरला. प्रेक्षकांकडून त्यांचं बरंच कौतुक करण्यात आलं. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण या चित्रपटात शाहुरुख दिसणार नसून त्याच्याऐवजी मुख्य भूमिकेत अभिनेता रणवीर सिंगची निवड करण्यात आली आहे. मात्र या भूमिकेसाठी रणवीर योग्य नसल्याचं बोललं जात आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक फरहान अख्तरने या चित्रपटात शाहुरुखला का कास्ट केलं नाही, याबाबतचा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

आणखी वाचा – “त्यांची लायकीच ती आहे”, तनुश्री दत्ताचं नाना पाटेकरांबाबत पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “माझं भांडण…”

याबाबत बोलताना फरहान म्हणाला, “चित्रपटामधील भूमिका दुसऱ्या अभिनेत्याला ऑफर करण्याच्या परिस्थितीमध्ये मी नाही. कित्येक वर्ष आम्ही या गोष्टीवर चर्चा केली आहे. चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची माझी इच्छा होती. पण आमच्या दोघांचं एकमत होत नव्हतं. त्यामुळे सहमतीने आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. बहुदा यामधून चांगलं काहीतरी समोर येईल”.नुकताच ‘डॉन ३’ चित्रपटातील रणवीरचा लूक समोर आला. यात तो वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. त्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा होत होती. हा लूक प्रेक्षकांना बराच पसंतही पडला आहे पण तरीही या चित्रपटासाठी तो योग्य की अयोग्य याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Tags: bollywood actorbollywood filmdon 3farhan akhtarranveer singhshah rukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Myra Vaikul got emotional on Ganesh Visarjan

Video : बाप्पाला निरोप देताना रडू लागली मायरा वायकुळ, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.