shivani naik amit rekhi engagement : मराठमोळा अभिनेता अमित रेखी लवकरच बोहल्यावर चढणार आहे आणि अमितच्या साखरपुड्याच्या विधींना सुरुवात झाली असल्याच पाहायला मिळत आहे. अमित ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्री शिवानी नाईकसह लग्नबंधनात अडकणार आहे आणि त्यांच्या साखरपुड्याच्या विधींच्या फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघेही कलाविश्वात बऱ्यापैकी सक्रिय असलेले पाहायला मिळतात. यापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली कोणत्याही माध्यमाद्वारे दिली नव्हती तर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी अखेर प्रेमाची कबुली दिली.
अमित व शिवानी यांचा आज २६ ऑक्टोबर २०२५ रोजी साखरपुडा समारंभ संपन्न होणार आहे आणि त्यांच्या साखरपुडा विधींना सुरुवात झाली आहे. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील अमित आणि शिवानी यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या साखरपुड्याला हजेरी लावल्याच पाहायला मिळालं. निवेदिता सराफ यांच्या एंट्रीला अमित आणि शिवानी यांनी त्यांचा स्वागत करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी निवेदिता यांनी दोघांनाही जवळ घेत मिठी मारली.
निवेदिता आणि अमित यांनी ‘भाग्य दिले तू मला’ या कलर्स मराठी चॅनलच्या मालिकेत एकत्र काम केले होते. आई मुलासारखा त्यांचा हा बॉण्ड मालिकेत पाहायला मिळाला. आता रील लाइफ आई रील लाईफ मुलाला त्याच्या खऱ्याआयुष्यातील एका मोठ्या क्षणातील आनंदाचा भाग होण्यासाठी सहभागी झाली आहे. निवेदिता आणि अमित रेखी यांचा बॉण्ड नेहमीच खूप खास असल्याचा पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक एकत्र फोटो पाहायला मिळाले. त्यामुळे निवेदिता यांनी न चुकता आणि आवर्जून अमितच्या साखरपुड्याला हजेरी लावल्याच पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – अप्पीच्या आयुष्यात खऱ्या अर्जुनची एंट्री, शिवानी-अमितचा साखरपुडा लूक समोर, Video व्हायरल
विधी दरम्यान निवेदिता यांनी अमित आणि शिवानी यांचं औक्षणही केल्याचं पाहायला मिळालं. सध्या निवेदिता यांच्याबरोबरचे अमित आणि शिवानी यांचे फोटो तुफान वायरल होताना पाहायला मिळत आहेत.





