बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सतीश शाह यांच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, ऑनस्क्रीन लेकाने दिला खांदा, तर सून पार्थिवासमोर ढसाढसा रडली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2025 | 3:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
satish shah last rites

सतीश शाह यांच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, ऑनस्क्रीन लेकाने दिला खांदा, तर सून पार्थिवासमोर ढसाढसा रडली

satish shah last rites : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे. ७४ वर्षीय अभिनेत्याचे शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी निधन झाले आणि आज २६ तारखेला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश शाह यांना निरोप देण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आले होते. रुपाली गांगुली, सुमीत राघवन आणि राजेश कुमार ही कलाकार मंडळी सतीश यांच्या अंतिम संस्काराला ढसाढसा रडताना दिसली. या तिघांनीही सतीशसोबत ‘साराभाई वर्सेस साराभाई’मध्ये काम केले होते. सतीश शाह यांना अखेरच्या प्रवासाला जाताना पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

सतीश शाह यांना स्वतःचे मूल नव्हते, त्यामुळे त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा राजेश कुमार यांच्याशिवाय अशोक पंडित यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्याचवेळी सतीश शाह यांच्या पत्नीची प्रकृती वाईट आहे. यावेळी त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली कल्पना करणे कठीण आहे. सतीश शाह किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि काही काळापूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणही करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आणखी वाचा – ऑनस्क्रीन लेकाला आशीर्वाद द्यायला पोहोचल्या निवेदिता सराफ, अमित रेखी-शिवानी नाईकच्या साखरपुड्याला खास हजेरी, औक्षणही केलं…

#WATCH | Maharashtra: The last rites of veteran Bollywood and TV actor Satish Shah, who passed away yesterday, are being performed at Pawan Hans, Vile Parle (West), Mumbai. pic.twitter.com/7HuiT1LK4R

— ANI (@ANI) October 26, 2025

राजेश कुमार यांनी सतीश शाह यांच्या खांद्याला खांदा दिला. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या टीव्ही शोमध्ये त्यांनी सतीशच्या मुलाची भूमिका साकारली होती. सतीश शाह यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक स्टार्स उपस्थित होते. नसीरुद्दीन शाह त्यांच्या मुलासोबत दिसले तेव्हा दिलीप जोशी, दिलीप ताहिर, सुमित राघवन, जेडी मजेठिया, नील नितीन मुकेश आणि इतर कलाकार त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले. दरम्यान, ‘अनुपमा’ अभिनेत्री रुपाली गांगुलीचा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये ती अभिनेत्याच्या पार्थिवाजवळ रडताना दिसत आहे.

Tags: bollywood newssatish shah deathsatish shah last rites
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Prarthana Behere Father Died

प्रार्थना बेहेरेला पितृशोक, वडिलांचे अपघातात निधन, भावुक पोस्ट करत म्हणाली, "डोळ्यांतील पाणी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.