गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अप्पीच्या आयुष्यात खऱ्या अर्जुनची एंट्री, शिवानी-अमितचा साखरपुडा लूक समोर, Video व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2025 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shivani naik amit rekhi engagement

अप्पीच्या आयुष्यात खऱ्या अर्जुनची एंट्री, शिवानी-अमितचा साखरपुडा लूक समोर, Video व्हायरल

shivani naik amit rekhi engagement : मराठी मालिका विश्वातून नुकतीच एक सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक म्हणजे सर्वांची लोकप्रिय अप्पी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि अप्पीला तिच्या खऱ्या आयुष्यातील अर्जुन भेटला आहे. आणि हा तिच्या खऱ्या आयुष्यातील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित रेखी असून हा देखील अभिनय क्षेत्रात बऱ्यापैकी सक्रिय आहे. अखेर शिवानी आणि अमित लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत आणि त्यांच्या साखरपुड्याच्या विधींना सुरुवात झाली असल्याच समोर आलं आहे.

‘इट्स मज्जा मराठी’ ने अमित आणि शिवानी यांचा साखरपुड्यातील एक्सक्लुझिव्ह लूक त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये शिवानी आणि अमित वेगळ्याच पारंपारिक अंदाजात खूपच सुंदर दिसत आहेत. शिवानीने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर असलेल्या गोल्डन काठाने तिच्या लूकमध्ये अधिकच भर घातली आहे. तर शिवानीने परिधान केलेल्या ब्लाऊज वरील सुंदर अशा स्त्रीच्या चित्राने लक्ष वेधलं आहे. तसेच शिवानीने घेतलेल्या शेला हा मोगऱ्याच्या वेलीचा असल्याने तिच्यावर खूपच सुंदर दिसतोय.

आणखी वाचा – अर्चना पूरण सिंहच्या कमाईवर पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, “टीव्ही-फिल्म्सपेक्षा युट्युब व्लॉग्समधून ती…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

तर अमितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. या लूकमध्ये अमित खूपच सिंपल दिसतोय. दोघेही हातात हात घालून एकमेकांसह व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. साखरपुड्याच्या विधीसाठी दोघेही सज्ज असल्याच पाहायला मिळत असून ते खूप खुश दिसत आहेत. आता लवकरच ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल, शम्मी कपूर यांचा होता उल्लेख, ते पाहून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी

शिवानी नाईक ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. तर अमित ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंती उतरला.

Tags: amit rekhiappi amachi collectorshivani naik
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
shivani naik amit rekhi engagement

शिवानी नाईक व अमित रेखीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, लूक व अंगठीच्या डिझाइनने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.