शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रिया सेनच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही व्यक्त केलं दुःख

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 19, 2024 | 4:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress Munmun husband and father of Raima and Reya Sen father Bharat Dev Verma passed away at the age of 83 in Kolkata.

अभिनेत्री मुनमुन यांचे पती, रायमा व रिया सेन यांचे वडील भरत देव वर्मा यांचं निधन

अभिनेत्री मुनमुन सेन यांचे पती, रायमा सेन आणि रिया सेन यांचे वडील भरत देव वर्मा यांचे आज कोलकाता येथे निधन झाले. आज १९ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील त्यांच्या घरी सकाळी ०९ च्या सुमारास भरत देब वर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, भरत देव वर्मा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कोलकाता येथील ढाकुरिया येथील एका खाजगी रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ते ८३ वर्षांचे होते. वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेत्री रायमा सेन कोलकात्याला रवाना झाली आहे. जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा ती जयपूरमध्ये शूटिंग करत होती. (Bharat Dev Verma Passed Away)

भारत देव वर्मा यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी लिहिलं आहे की, “मुनमुन सेन यांचे पती आणि माझे हितचिंतक भारत देव वर्मा यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अत्यंत प्रेमळ होते. मी त्यांच्या आठवणी कायम माझ्या मनात जपून ठेवीन. त्यांनी खरोखरच मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानलं होतं. त्यांच्या निधनाने मी खूप काही गमावलंय. सकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच मी त्यांच्या बालीगंगे इथल्या निवासस्थानी गेले. तिथे त्यांची मुलगी रिया उपस्थित होती. तर पत्नी मुनमुन आणि दुसरी मुलगी रायमा दिल्लीहून येत आहेत. त्यांनी मी श्रद्धांजली अर्पित करते आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते”.

Saddened by the demise of Bharat Dev Varma, the husband of filmstar Moon Moon Sen, and himself a great well-wisher of mine.

He was indeed very loving and affectionate to me and I shall always treasure his memories. He truly considered me as part of his family and his demise is…

— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 19, 2024

आणखी वाचा – Appi Amchi Collector : अमोलच्या आजारपणावर उपचार सुरु, अप्पी-अर्जुनची अमोलला साथ पण…

भरत देव वर्मा राजघराण्यातील आहेत. ते त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. भरत यांची आई इला देवी कूचबिहारची राजकुमारी आणि जयपूरची राणी गायत्री देवी यांच्या मोठ्या बहीण होत्या. भरत यांची आजी इंदिरा या वडोदराचे महाराज सर्जीराव गायकवाड तिसरे यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांनी अभिनेत्री मुनमुन सेनसोबत लग्न केले होते. रायमा सेन आणि रिया सेन या अभिनेत्रींचे ते वडील आहेत.

आणखी वाचा – “फालतूपणा दाखवू नका”, ‘तुला शिकवीन…’वर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “कथाच बदला आणि…”

मुनमुन सेन यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. १९८४ मध्ये ‘अंदर बाहर’ टा चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी विविध भाषांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यात ‘100 डेज’, ‘सिरीवेन्नेला’ यांचा समावेश आहे. भारत देव आणि मुनमुन यांची मुलगी रिया सेनने हिंदी, बंगाली, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Tags: Bharat Dev Verma DeathBharat Dev Verma Death NewsRiya Sen Father Bharat Dev Verma Death
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte fame yash aka Actor Abhishek Deshmukh talk about the two memorable scenes from the serial

'आई कुठे…'च्या आठवणींमध्ये रमला अभिषेक देशमुख, आई-लेकाच्या 'तो' सीन आठवला अन्…; म्हणाला, "अत्यंत जवळचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.