छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. आगळी वेगळी कथा आणि वेगळा विषय घेऊन आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गेले कित्येक आठवडे ही मालिका प्रेक्षक पसंतीच्या अव्वल स्थानी आहे. मात्र आता या मालिकेवर प्रेक्षक नाराज आहेत आणि याचं एकमेव कारण म्हणजे मालिकेचं बदललेलं कथानक. सध्या मालिकेत सुरु असलेलं कथानक पाहून प्रेक्षक मालिकेवर नाराज झाले आहेत आणि या नाराजीच्या अनेक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मालिकेच्या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाल्याची पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते. अशातच नुकत्याच झालेल्या भागात चारुलताला अधिपतीनेही आपली आई मानलं आहे. नुकत्याच झालेल्या भागात अधिपतीने चारुलताला आईसाहेब अशी साद दिली. मालिकेच्या या नवीन ट्विस्टच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – Appi Amchi Collector : अमोलच्या आजारपणावर उपचार सुरु, अप्पी-अर्जुनची अमोलला साथ पण…
या प्रोमोखाली प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांना हा ट्विस्ट आवडला नसल्याचे म्हटलं आहे. “आधी मालिका खूप छान होती पण आता ही मालिका बकवास झाली आहे”, “बंद करा ही मालिका, दाखवायला काही राहिलं नसेल तर उगाच फालतूपणा करू नका”, “शिक्षणापेक्षा अशिक्षित असणे श्रेष्ठ असा संदेश मालिकेमधून जात आहे कृपया ताबडतोब हे दाखवणे बंद करा”, एकतर बंद करा नाहीतर मालिकेची कथा बदला आणि अशीच सुरु राहिली तर मालिका बंद करावी लागेल”. अशा अनेक कमेंट्स करत प्रेक्षकांनी केल्या आहेत.
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मलिकेत इतके दिवस अधिपती व चारुलता यांचे नाते तणावपूर्व होते. अधिपती चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. पण आता त्याने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारले की काय? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच चारुलताच्या या जाळ्यात अडकलेल्या अधिपतीला अक्षरा कशी बाहेर काढणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.