शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कौतुकाने खायला थांबले पण…”, भूक लागलेली असताना ‘श्री दत्त स्नॅक्स’ने दिलेले पोहे बघूनच भडकली मुक्ता बर्वे, म्हणाली, “पैसे गेल्याचं दुःख…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 9, 2023 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mukta Barve angry on Shree Datta Snacks

भूक लागलेली असताना ‘श्री दत्त स्नॅक्स’ने दिलेले पोहे बघूनच भडकली मुक्ता बर्वे

अभिनेत्री मुक्ता बर्वेला मराठीतील गुणी व सक्षम अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रुपेरी पडदा असो किंवा छोटा पडदा, मुक्ताने सर्वच माध्यमात विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने साकारलेल्या भूमिकांमधून आपला सशक्त अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती याद्वारे फोटोज व व्हिडिओज शेअर करते. शिवाय, ती अनेक मुद्द्यांवर आपले परखड मत व्यक्त करते. (Mukta Barve angry on Shree Datta Snacks)

मुक्ताचं रंगभूमीवर ‘चारचौघी’ या नाटकाचे राज्यभरात प्रयोग सुरु आहेत. त्यानिमित्ताने मुक्ता अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे व अन्य कलाकारांसह राज्यभरात ठिकठिकाणी दौरे करताना दिसत आहे. दरम्यान, पुढील प्रयोगासाठी नाटकाची संपूर्ण टीम नाशिकला जात असताना मुंबईजवळील ‘श्री दत्त स्नॅक्स’ येथे विश्रांतीसाठी थांबली. यावेळी ती तिथल्या असुविधांमुळे चांगलीच भडकली. शिवाय, तेथील प्रसिद्ध असलेल्या पोह्याच्या चवीबद्दल सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली.

मुक्ताने त्या पोह्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. फोटोसह लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणाली, “माझा विश्वासच बसत नाही! खरंतर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ची फॅन आहे. मुंबई-पुणे असा प्रवास करताना मी अनेकदा तेथील पोहे खाण्यासाठी आवर्जून थांबते. आज नाशिकला जाताना पडघा टोलनाका जवळ कौतुकाने थांबले आणि गरम पोहे मागवले. पण, त्यांनी अत्यंत अनास्थेने, गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम पोहे दिले. आणि कमिटमेंट एवढी की, पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बस्स! पोह्याला जरा चव यावी, म्हणून कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, लिंबू… पण यातील काहीच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डिशमध्ये कोणीतरी एवढी अनास्था वाढून दिली, याचं मला वाईट वाटलं.”

हे देखील वाचा – “तुला गमावल्याचं दुःख…”, काही महिन्यांपूर्वी निधन झालेल्या भावासाठी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, म्हणाली, “खूप लवकर गेलास आणि…”

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “हे पाहून असं वाटतंय की, उपकार केल्यासारखे हे पोहे केले.” तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं, “आजकाल पैसे देऊनसुद्धा नीट खायला मिळत नाही अशी अवस्था आहे.” तर काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला तर्री पोहे खाण्याची हटके विनंती केली आहे.

हे देखील वाचा – Video : याला म्हणतात देशमुखांच्या सूनेचे संस्कार, रस्त्यावरील मुलं भेटायला आल्यावर जिनिलियाने काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

मुक्ताने आजवर अनेक नाटक व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नाटकाबरोबर मुक्ता ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘वाय’, ‘आपडी थापडी’ अश्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. लवकरच ती ‘रावसाहेब’ या मल्टीस्टारर चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tags: charchoughi natakmukta barve
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bobby Darling fight with a Passanger in Delhi Metro

Video : दिल्ली मेट्रोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रवाशाला मारहाण, शिवीगाळही केली अन्…; धक्कादायक प्रकार समोर, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.