हिंदी टीव्हीवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वात झळकलेली अभिनेत्री बॉबी डार्लिंग कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. मात्र, आता ती एका घटनेमुळे पुन्हा चर्चेत आली. बॉबी डार्लिंगने एका प्रवाश्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. दिल्ली मेट्रोमध्ये ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Bobby Darling fight with a Passenger in Delhi Metro)
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, बॉबी डार्लिंग दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यावेळी बॉबीच्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी होती. तेव्हा एक प्रवासी बॉबीच्या हातातील ती पिशवी खेचण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर अभिनेत्री व त्या प्रवाश्यामध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला, की तिने त्या प्रवाश्याला अपशब्द वापरत त्याला मारहाण करताना दिसली. त्यानंतर मेट्रोमधील उपस्थित CISF जवानांनी तातडीने मध्यस्थी करत हा वाद सोडवला.
हे देखील वाचा – “कौतुकाने खायला थांबले पण…”, भूक लागलेली असताना ‘श्री दत्त स्नॅक्स’ने दिलेले पोहे बघूनच भडकली मुक्ता बर्वे, म्हणाली, “पैसे गेल्याचं दुःख…”
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली मेट्रोमध्ये मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता या मेट्रोमध्ये प्रवास करणं अवघड झालं असल्याचे नेटकरी कमेंट्सद्वारे म्हणत आहे. दरम्यान, दिल्ली मेट्रो प्रशासनाने या घटनेचा निषेध करत अभिनेत्रीवर त्वरित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हे देखील वाचा – ब्रेनस्ट्रोकने घेरलं, बोलताही येईना अन्…; राहुल मेहेंदळेची झाली होती बिकट अवस्था, बायको म्हणालेली, “मला रडू आवरेना कारण…”
Kalesh b/w Bobby Darling and a Guy inside Delhi metro over little issue pic.twitter.com/M1H0LmyKu5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 5, 2023
अभिनेत्री बॉबी डार्लिंगचे खरे नाव पंकज शर्मा आहे. ती तृतीयपंथी अभिनेत्री असून तिने ‘स्टाइल’, ‘मैंने दिल तुझको दिया’, ‘पेज 3’, ‘हंसी तो फंसी’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे. शिवाय, ती ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वातदेखील झळकली आहे. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या सातत्याने संपर्कात राहते.