शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये दिसणार मृण्मयी देशपांडे, पोस्ट शेअर करत दिली माहिती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2023 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande New Movie

मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक 'स्वरगंधर्व सुधीर फडके'मध्ये दिसणार मृण्मयी देशपांडे, पोस्ट शेअर करत दिली माहिती

स्वरगंधर्व अशी करून दिले जाणारे असे दिग्गज ज्यांनी गदिमांच्या गीत रामायणाला स्वर साज चढवला आणि मराठी घराघरात, मनामनात गीत रामायण आपल्या जादुई आवाजाने अजरामर केलं असे मराठी संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकार सुधीर फडके अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी यांच्या जीवनावर मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार असल्याची गोड बातमी एका मराठमोळ्या, निरागस अभिनेत्रीने दिली. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबातची माहिती चाहत्यांसह शेअर केली. (Mrunmayee Deshpande New Movie)

मृण्मयी देशपांडे हिने आजवर मराठी कलाविश्वात स्वतःच नाव कमावलं आहे. अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या जोरावर तिने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. इतकंच नव्हे तर एक उत्तम निवेदिका म्हणून मृण्मयीचं नाव अग्रस्थानी असतं. अशातच मृण्मयी एका भव्य दिव्य संगीतमय चित्रपटाचा भाग असल्याची खुशखबर तिने पोस्ट शेअर करत दिली आहे.

आणखी वाचा – मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये दिसणार मृण्मयी देशपांडे, पोस्ट शेअर करत दिली माहिती

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

मृण्मयीने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सुधीर फडके यांच्या बायोपिकच मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. “मनाला मोहवून टाकणारं संगीत, भाव-भक्तीचा ओलावा निर्माण करणारं शब्दसामर्थ्य आणि तीन पिढ्यांवर सांस्कृतीक जडणघडणीतून होणारा संस्कार म्हणजेच “स्वरगंधर्व सुधीर फडके” हे अजरामर नाव! मराठी चित्रपट विश्वातील सर्वात भव्य, संगीतमय बायोपिक- लवकरच!” असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. या भव्य चित्रपटाचा भाग मृण्मयी असून तिला या चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

आणखी वाचा – किरण मानेंना मिळाली दसऱ्याच्या आदल्या दिवशी अनोख्या चाहत्यांची अनोखी भेट, तृतीयपंथीयांकडून मिळाला लाखमोलाचा आशीर्वाद

प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय आदिश वैद्य, सागर तळाशिलकर, मिलिंद पाठक, अपूर्व मोडक, शरद पोंक्षे, सुखदा खांडकेकर आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. मराठीतला आजवरचा सर्वात मोठा म्युजिकल बायोपिक “स्वरगंधर्व सुधीर फडके” असणार आहे. हा चित्रपट आता रुपरी पडद्यावर केव्हा येणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

Tags: entertainmentmarathi actressmarathi biopicmarathi serialmrunmayee deshpandeMrunmayee Deshpande New Movienew filmnew movieswargandharv sudhir phadke
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kranti Redkar Answers To Trollers

मुलींचे चेहरे न दाखवण्यावरून नेटकऱ्यांनी केला क्रांती रेडकरला सवाल, उत्तर देत म्हणाली, माझ्या मुलींना सांभाळायची जबाबदारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.