शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो कॅफेमध्येही काम करायचा तेव्हा…”, रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर मृणाल दुसानिसला आठवले नवऱ्याचे जुने दिवस, म्हणाली, “आम्हा दोघांना…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 18, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Mrunal Dusanis interaction with Itsmajja on the occasion of the new restaurant and she also talked about her husband's old work.

नवीन रेस्टॉरंटच्या निमित्ताने मृणाल दुसानिसने इट्स मज्जाबरोबर साधला खास संवाद, नवऱ्याच्या जुन्या आठवणींविषयी म्हणाली...

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. साधी, सोज्वळ, सुशील अशा अभिनेत्रींच्या यादीत मृणालचं नाव आवर्जून घेतलं जातं. छोटा पडदा गाजवलेल्या मृणालने मात्र काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. मात्र आता अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. लवकरच अभिनेत्री ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी तिने आणखी एक आनंदवार्ता दिली आहे ती म्हणजे तिच्या नवीन रेस्टॉरंटची. (Mrunal Dusanis Husband Job)

अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं असून ठाण्यात तिने स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. मृणाल आणि नीरज या दोघांनी ठाण्यात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं असून याचं नाव Belly Laughs असं आहे. कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद लोकांना रेस्टॉरंटमध्ये घेता येईल. ठाण्यातील हिरानंदानी भागात मृणालने हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे. यावेळी मृणालने आपल्या नवऱ्याच्या साथीने फूड इंडस्ट्रीमध्ये काही तरी करायचे असल्याचे सांगितले. या रेस्टॉरंटच्या उद्घाटनानिमित्त ‘इट्स मज्जा’बरोबर मृणालने आपल्या पतीसह खास संवाद साधला.

आणखी वाचा – मौलाना सज्जाद नोमानींना भेटल्यानंतर स्वरा भास्करवर भडकले नेटकरी, संतप्त कमेंट, म्हणाले, “महिलांच्या विरोधात बोलतो आणि…”

यावेळी मृणालने असं म्हटलं की, “आम्हा दोघांनाही लोकांना खाऊ घालण्याची आवड आहे. आम्ही घरच्या घरी काहीना काही बनवायचो आणि लोकांना खायला बोलवायचो. तर तो प्रवास आता रेस्टॉरंटपर्यंत आला आहे. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअरचं शिक्षण घेत असतानाच तो कामही करत होता. कॅफेमध्ये वगैरे तो काम करायचा. त्यामुळे या रेस्टॉरंटला त्याची तेव्हाची एक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आणि माझी आवड असं मिळून आमचं हे रेस्टॉरंट उभं झालं आहे”.

आणखी वाचा – आकर्षक इंटिरिअर, प्रशस्त जागा अन्…; असं आहे मृणाल दुसानिसचं ठाण्यातील नवीन रेस्टॉरंट, पाहा Inside Video

दरम्यान, मृणालने या नवीन व्यवसायासह प्रेक्षकांचे मनोरंजन करायला देखील सुरुवात केली आहे. लवकरच ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मृणालबरोबर अभिनेता विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे हे कलाकार आहेत. येत्या १६ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल   

Tags: marathi actressmrunal dusanisMrunal Dusanis Husband Job
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shiva Serial New Promo

आशु-शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे येणार मोठं संकट, प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, "मालिकांची वाट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.