रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘माहेरची साडी’च्या रिमेकमध्ये कोणती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारेल मुख्य भूमिका?, अलका कुबल म्हणाल्या, “सोनाली, मुक्ता, अमृता या…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 3, 2024 | 4:42 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Alka Kubal talked on the remake of the movie 'Maherchi Sadi'.

'माहेरची साडी'च्या रिमेकमध्ये कोणती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारेल मुख्य भूमिका?, अलका कुबल म्हणाल्या, "सोनाली, मुक्ता, अमृता या..."

अलका कुबल यांची ‘माहरेची साडी’ हा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. ९०च्या दशकातील या चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठत एक नवा इतिहास रचला होता. मराठी रसिकांच्या मनावर विशेषतः महिला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाबद्दल आजही चर्चा होताना दिसून येतात.

‘माहेरची साडी’मध्ये अलका कुबल यांनी साकारलेल्या सोशिक मुलगी व सूनेच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. चित्रपटाप्रमाणेच त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ३२ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट आताच्या काळात आला तर या चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका कोणती अभिनेत्री साकारू शकते? याबद्दल अलका कुबल यांनी भाष्य केले आहे.

अलका कुबल यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘माहेरची साडी’च्या रिमेकबद्दल भाष्य केले आहे.  यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “त्या काळातले चित्रपट आताच्या काळात लोकांकडून किती व कशाप्रकारे स्वीकारल्या जातील हे सांगू शकत नाही. ३२ वर्षांपूर्वी ते चित्रपट चालून गेले. आता काळ बदलला आहे, चित्रपटांच्या कथा बदलल्या आहेत. आताची आपली जीवनशैलीही बदलली आहे. त्यामुळे आता अशा चित्रपटांना यश मिळेल की नाही माहीत नाही.”

आणखी वाचा – Video : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार, शोरुममध्येच पूजा केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आता रडारडीच्या नायिका खूप कमी आहेत. फक्त मालिकांमध्ये अशा नायिका असतात आणि त्यांच्या कथाही तशा असतात. पण माझ्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी व अमृता खानविलकर या आहेत. त्यामुळे यापैकी कोणीही ही भूमिका करु शकेल आणि ही भूमिका साकारणं एवढं काही अवघड नाही.”

आणखी वाचा – एकाच हॉटेलमध्ये आहेत अप्पी-अर्जुन, अमोलची त्याच्या वडिलांबरोबर भेट होणार का?, मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट

दरम्यान, सध्या अलका कुबल या कलर्स वाहिनीवरील ‘डॉ. निलेश साबळेच्या ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याआधीही त्यांनी एका लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे.  

Tags: alka kubalmaherchi sadimarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Big sale of branded clothes in Mumbai, clothes from only Rs. 200 see the details

Branded कपड्यांचा मुंबईमध्ये मोठा सेल, फक्त २०० रुपयांपासून मिळणार कपडे, ठिकाण व वेळ काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.