गुरूवार, ऑगस्ट 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कलाकारासाठी खूप मोठं…”, डोंबिवलीमध्ये मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, दोघंही भारावले, म्हणाली, “आमच्याही चेहऱ्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 11, 2024 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

"कलाकारासाठी खूप मोठं…", डोंबिवलीमध्ये मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, दोघंही भारावले, म्हणाली, "आमच्याही चेहऱ्यावर…"

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायिका प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश यांनी या रिऍलिटी शोमधून त्यांचा गायनक्षेत्रातील प्रवास सुरु केला. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या गायनाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्यांच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. महाराष्ट्राबाहेरही ही जोडी चाहत्यांच्या प्रेमापोटी गायनसेवेसाठी सदैव तत्पर असते. अशातच दोघांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)

मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन डोंबिवली येथील एका कार्यक्रमादरम्यानचा खास फोटो शेअर केला आहे. स्वरपौर्णिमा या कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन हाऊसफुल बोर्ड हातात घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मुग्धाने हाऊसफुलचा आनंद व्यक्त केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी, “आणखी एक हाऊसफुल्ल. काल मी व प्रथमेशने आमच्या लाडक्या म्युझिशियन्स दादांबरोबर डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम सादर केला”, असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा – मुहूर्त ठरला, मंडपही सजला! सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची जय्यत तयारी, ‘या’ ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात होणार लग्न

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

यापुढे तिने लिहिलं आहे की, “नेहमीप्रमाणेच डोंबिवलीकर मायबाप रसिकांनी कालच्या कार्यक्रमाला हाऊसफुल प्रतिसाद दिला. हाऊसफुलच्या बोर्डाबरोबर फोटो काढण्याचं समाधान प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठं असतं जसं ते आमच्याही चेहऱ्यावर झळकतं आहे. खूप खूप खूप मनापासून धन्यवाद, रसिकहो! लगेचच दुसरीकडे जाण्याची घाई असल्यामुळे रसिकांसह फोटो काढायचे राहिले. पुढच्यावेळी नक्की काढू”, असं कॅप्शन देत म्हटलं आहे.

आणखी वाचा – वऱ्हाड निघालं लग्नाला!, तितीक्षा तावडेच्या लग्नाला निघाले ‘सातव्या मुलीची…’मधील कलाकार, नाकात नथ घालून गाडीमध्येच ऐश्वर्या नारकरांचा डान्स अन्…

“आमचं ठरलं म्हणत मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन दिली. त्यांनतर दोघांनी त्यांचा शाही विवाहसोहळा उरकत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे व लग्नपूर्वीच्या विधींचे अनेक फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडले. लग्नानंतर ही जोडी लगेचच कामाला लागली असून ते दौरे करत गायनसेवा करताना दिसले.

Tags: entertainmentmugdha vaishampayanmugdha vaishampayan and prathamesh laghateprathamesh laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Next Post
Shiv Thakare’s fans expressed anger after his eviction from 'Jhalak Dikhhla Ja 11'

"सगळ्यांनी राजकारण केलं आणि...", 'झलक दिखला जा ११'मधून शिव ठाकरेला बाहेर काढल्यानंतर लोकांचा संताप, म्हणाले, "मेहनत घेतो तरीही..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.