सध्या बॉलिवूडमध्ये नव नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अनेक चित्रपटांची आजवर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये तो स्वतः मुख्य भूमिकेमध्ये दिसून आला आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री अंकिता लोखंडेदेखील मुख्य भूमिकेमध्ये दिसली आहे. पण या चित्रपटायला प्रेक्षकांनी नक्की कसा प्रतिसाद दिला आहे ते जाणून घेऊया. (swatantrya veer sawarkar movie first day collection )
स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर अवलंबून असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याचित्रपटाच्या निमित्ताने रणदीप पहिल्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. हा चित्रपट चांगली कामगिरी करेल अशी आशा सर्वांनाच आहे. अशातच आता पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांवरून या चिटपटाला प्रेक्षकांनी किती पसंती दिली आहे हे समजून येईल.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. पण समीक्षकांच्या मते या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे शनिवार व रविवारच्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपट २० ते २५ कोटी रुपयांमध्ये तयार झाला आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी रणदीपने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी स्वतःचे घर विकल्याचेही सांगितले होते. तसेच या चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासाठी आणि भूमिकेला न्याय देण्यासाठी खूप मेहनत केल्याचेही दिसून आले आहे. त्याने या चित्रपटासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केले होते. त्याच्या या मेहनतीचे त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.
काही दिवसांपूर्वी रणदीपने आपल्या ट्रान्सफोर्मेशन केलेला एक फोटो सोशल मीडियावर आपलोड केला होता.त्या फोटोमध्ये तो खूपच बारीक दिसत होता. त्यावरून ही भूमिका साकारण्यासाठी त्याने खूपच मेहनत घेतलेली दिसून येत आहे. त्याचा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्की काय कमाल दाखवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.