शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विजय सत्याचाच होणार! आर्यन खान प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा निर्णय ऐकताच क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाली, “त्यांच्या बाजूनं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 14, 2024 | 1:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar Post For Her Husband

विजय सत्याचाच होणार! आर्यन खान प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा निर्णय ऐकताच क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाली, "त्यांच्या बाजूनं..."

अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत क्रांतीच नाव आवर्जून घेतलं जात. क्रांती नेहमीच न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते. बरेचदा ती तिच्या पतीबाबतच्याही पोस्ट शेअर करताना दिसते. क्रांतीचे पती समीर वानखेडे हे NCB चे अधिकारी आहेत. NCB मध्ये उच्च पदावर कार्य करत असताना त्यांच्यावर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. याबाबतही क्रांती तिच्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याच्या पोस्ट शेअर करताना दिसते. (Kranti Redkar Post For Her Husband)

कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आरोपी घोषित केल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांनी शाहरुखकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली, असल्याचा आरोप त्यांच्यावर लागवण्यात आला. या आरोपाखाली वानखेडे यांच्यासह चार जणांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला. त्यादरम्यान ईडीनेही वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आता वानखेडेंना काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. क्रांतीने याबाबतची पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ संपताच भाऊ कदमचा कुटुंबाबरोबर विमान प्रवास, बायकोही दिसते खूपच सुंदर, फोटो शेअर करत म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

सदर प्रकरणात राष्ट्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी वानखेडेंना दिलासा देत त्यांच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यानंतर वानखडे यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात आता दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडेंना मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयानंतर समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘विजय हा सत्याचाच होणार’, असं कॅप्शन देत तिने न्यायालयाचे अपडेट्स असलेली एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर तिने, “पुन्हा सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते! मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन, माय लव्ह”, असं लिहिलं आहे.

आणखी वाचा – “४५ महिने होऊनही अद्याप…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत बहिणीचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाऱ्हाणं, म्हणाली, “या प्रकरणात…”

क्रांतीची नवऱ्यासाठीची कौतुक करणारी ही खास पोस्ट तिने शेअर करताच यावर चाहत्यांनी भरभरुन कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत ‘विजय सत्याचाच होणार’, असं म्हणत त्यांना पाठिंबा दिला आहे.

Tags: entertainmentkranti redkar and sameer wankhedeKranti Redkar Post For Her Husbandmarathi actressmarathi serialSameer Wankhede
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Vidyadhar Joshi Incident

बायकोने हाक मारताच आयसीयूमध्ये ७२ तासांनी डोळे उघडले अन्…; विद्याधर जोशींचा मृत्यूशी संघर्ष, म्हणाले, “तो क्षण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.