शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोने हाक मारताच आयसीयूमध्ये ७२ तासांनी डोळे उघडले अन्…; विद्याधर जोशींचा मृत्यूशी संघर्ष, म्हणाले, “तो क्षण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 14, 2024 | 2:07 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vidyadhar Joshi Incident

बायकोने हाक मारताच आयसीयूमध्ये ७२ तासांनी डोळे उघडले अन्...; विद्याधर जोशींचा मृत्यूशी संघर्ष, म्हणाले, “तो क्षण...”

कोविडनंतर अनेकांना कठीण काळाचा सामना करावा लागला. यादरम्यान एका लोकप्रिय व दिग्गज अभिनेत्याला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागला. हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिनेता विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी. करोनाकाळात त्यांना फुप्फुसांचा फायब्रॉसिस हा गंभीर आजार झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आणखी काही चाचण्या केल्यावर फुफ्फुसं १३ टक्के निकामी झाल्याचं समजलं. या गंभीर आजारपणाचा सामना करत बाप्पा जोशी यांनी या आजारावर मात केली आहे. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर होते. (Vidyadhar Joshi Incident)

या त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. अशातच या आजारपणाबाबत त्यांनी नुकत्याच मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा नागावर शहारे आणणारा एक किस्सा सांगत ते म्हणाले, “ऑपरेशन झाल्यानंतर खरी काळजी घेण्याची आवश्यकता असते. ऑपरेशननंतर मी आयसीयूमध्ये होतो. मला काहीच शुद्ध नव्हती. यावर बाप्पा जोशी यांची बायको म्हणाली, “सुरुवातीला आम्हाला सांगितलं होत की, किमान १०-१२ दिवस आम्हाला भेटता येणार नाही. आम्ही बाहेरून काचेतून त्यांना बघू शकत होतो. पण ७२ तास उलटून गेल्यावरही ते शुद्धीवर आले नाहीत. त्यामुळे काळजीच वातावरण वाढलं. तेव्हा डॉक्टर माझ्याजवळ आले आणि म्हणाले की, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्ही त्यांना जाग करु शकता का?, ते प्रतिसाद देत नाही आहेत. डॉक्टरांना सुरुवातीला वाटलं की, मी घाबरेन. पण मला आयसीयूमध्ये जाऊन त्याला बघायला मिळणार म्हणून होकार दिला.

आणखी वाचा – …अन् देवाने पुन्हा एकदा जीवदान दिलं, विद्याधर जोशींचं फुफ्फुसच ८३ टक्के निकामी, मरणाच्या दारात पोहोचले आणि…; सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

पुढे त्या म्हणाल्या, “सतत हॉस्पिटलमध्ये असल्याने खूप टेन्शनही होत, एकप्रकारची बधिरता होती, त्यामुळे मी आयसीयूमध्ये जायला होकार दिला. आतमध्ये पीपीई किट घालून आत गेले, तेव्हा हा झोपलेला होता. डॉक्टर म्हणाले, मी त्यांना उठवायचा खूप प्रयत्न केला. ते ह्यांना विद्याधर या नावाने उठवत होते. याला विद्याधर या नावाने कोणीच ओळखत नाही. आम्ही घरी याला राजन नावाने बोलावतो न बाहेत याला बाप्पा म्हणतात. मी तिकडे जाऊन राजन ए राजन इतकाच आवाज दिला. आणि हे ऐकून याने एकदम डोळे उघडले.

आणखी वाचा – लग्नानंतर एकमेकांपासून लांब राहतात प्रसाद जवादे व अमृता देशमुख, भेटण्यासाठी साताऱ्याला गेली अन्…; फोटो व्हायरल

पुढे बाप्पा म्हणाले, “हा क्षण मलाही अजून आठवतो. मला ती एक हाक आठवतेय. घाबरुन नाही. एरव्ही बायकोच्या आवाजाला घाबरुन ओ देते हे ऐकून नाही”, असं ते गमतीत म्हणाले. हा किस्सा सांगताना दोघांच्याही डोळ्यात अश्रू आलेले पाहायला मिळाले.

Tags: marathi actorvidyadhar joshividyadhar joshi healthVidyadhar Joshi Incident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Ministry of Information and Broadcasting banned Some obscene content sites and apps

ओटीटीवरील अश्लील कंटेटविरोधात कठोर कारवाई, सरकारकडून ‘या’ साईट्स अन् ॲप्सवर बंदी, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.