बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘तेजस’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली. आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. जो बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करताना सध्या दिसत आहे. मात्र, त्यापूर्वी कंगना एका कारणासाठी चर्चेत आली होती. नुकतंच देशभरात विजयादशमीचा सण पार पडला. त्यानिमित्त दिल्लीत आयोजित रावण दहनाला कंगनाने हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, ५० वर्षांच्या इतिहासात रावण दहन करणारी ती पहिली महिला अभिनेत्री ठरली होती. दरम्यान, अभिनेत्रीच्या उपस्थितीवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. अशात राजकीय नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका कमेंटवर कंगनाचा आक्षेपार्ह फोटो टाकला. त्यावर तिने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Kangana Ranaut replies to Subramanian Swamy)
दिल्लीतील रावण दहनाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच व्हिडीओवर सुब्रमण्यम स्वामी यांनी कमेंट करत टीका केली होती. या कमेंटमध्ये त्यांनी कंगनाचा स्विमसूटमधील फोटो शेअर करत म्हणाले होते की, “एसपीजीच्या बोलण्यानुसार ती ‘frequent flyer’ आहे. एसपीजी का अशा गप्पा करतात? कारण, तुमच्या संघटनेवर कामाचा जास्त ताण आहे. त्यामुळे तिला रामलीलाच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणं हे प्रभू श्री राम यांच्यासाठी अशोभनीय आहे.”
हे देखील वाचा – अभिनेते विद्याधर जोशी अजूनही करत आहेत नोकरी, मोठ्या आजाराने होते त्रस्त, म्हणालेले, “दोन्ही फुफुस ८० ते ८५ टक्के निकामी झाले अन्…”,
According to SPG gossip she is a “frequent flyer”. Why should SPG gossip? Because of the organisation is overworked. Her being made chief guest in the Ramlila final day is the organisation’s conduct unbecoming of respect for Maryada Purushottam. https://t.co/NYqXePl8Pj
— Subramanian Swamy (@Swamy39) October 26, 2023
त्यावर लगेच कंगनाने ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “स्विमसूटचा फोटो आणि तुमचं हे विचित्र कथेतून तुम्ही असं सुचवत आहात की, राजकारणात आपली ओळख निर्माण करण्यासाठी माझ्याकडे माझ्या शरीराशिवाय दुसरं काहीही नाही. मी एक अशी कलाकार आहे, जी हिंदी चित्रपटांमधील आतापर्यंतची सर्वात महान कलाकार आहे. एक लेखक, दिग्दर्शक, निर्माती आणि उजव्या विचारसरणीचा प्रभावशाली क्रांतिकारी आहे. त्यामुळे एखादा तरुण नेता जर माझ्या जागी असता, तर तो भविष्यातील एक महान नेता व मार्गदर्शक ठरू शकला असता. तर मग तुम्ही राजकारणात आपली ओळख निर्माण करण्यासाठी कदाचित आपलं शरीर विकत असेल, हे मान्य करू शकाल का?”
हे देखील वाचा – Bigg Boss 17 : “आयुष्यामध्ये मला काही दिलं नाहीस निदान…”, अंकिता लोखंडेला नको नको ते बोलला नवरा, प्रेक्षकही भडकले, विकी म्हणाला, “मी तुझा नोकर…”
With a swimsuit picture and sleazy narrative you are suggesting that I have nothing else to offer except for my flesh to get my way in politics ha ha I am an artist arguably the greatest of all time in hindi films, a writer, director, producer, revolutionary right wing… https://t.co/dEcqamn7qO
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2023
“खोलवर रुजलेली लैंगिकता आणि स्त्री शरीराची सुप्त लालसा तुम्हाला एक विकृत व्यक्ती बनवते. मुळात, स्त्रिया या केवळ सेक्ससाठी नसतात, तर त्यांच्याकडे पुरुषांप्रमाणे मेंदू, हृदय, हात, पाय असे अनेक अवयव आहेत. आणि हे एक महान नेता बनण्यासाठी सर्वात आवश्यक आहे.”, असं म्हणत तिने सुब्रमण्यम स्वामी यांना प्रतिप्रश्न केला आहे. तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आलं असून अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, कंगनाचा ‘तेजस’ चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये ती मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटानंतर तिचा बहुप्रतीक्षित ‘Emergency’ चित्रपट येणार आहे. ज्यामध्ये ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.