शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “आयुष्यामध्ये मला काही दिलं नाहीस निदान…”, अंकिता लोखंडेला नको नको ते बोलला नवरा, प्रेक्षकही भडकले, विकी म्हणाला, “मी तुझा नोकर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 27, 2023 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Vicky Jain is angry with Ankita Lokhande in Bigg Boss 17

Bigg Boss 17 : "आयुष्यामध्ये मला काही दिलं नाहीस निदान…", अंकिता लोखंडेला नको नको ते बोलला नवरा, प्रेक्षकही भडकले, विकी म्हणाला, "मी तुझा नोकर…"

हिंदी टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली. यंदाच्या पर्वात अनेक बड्या कलाकारांसह सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरे बिग बॉसच्या घरात बंद झाले आहे. याच पर्वात प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विक्की जैन ही रिअल लाईफ जोडीदेखील सहभागी झाले आहे. दरम्यान, शोच्या पहिल्याच दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. दोघंही एकमेकांवर चिडताना अनेकदा दिसले. अशात या जोडीचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जे पाहून नेटकरी विक्कीवर चांगलेच संतापले आहे. (Vicky Jain is angry with Ankita Lokhande in Bigg Boss 17)

अंकिताचा पती विक्की जैन बिग बॉसच्या घरात अभिषेक कुमार आणि ईशा मालविय यांच्याबरोबर जास्त वेळ गप्पा मारताना दिसतो. विशेष म्हणजे, अंकिताचे काही दिवसांपूर्वी अभिषेकबरोबर भांडण झाले होते. तर, दुसरीकडे विक्की त्यांच्याशी बोलताना दिसला. जे पाहून अंकिता तिथून निघून जाते. अंकिताचं हे वर्तन विक्कीला आवडलं नाही आणि तो तिच्यावर चिडतो. पुढे विक्की अंकिताशी जेव्हा बोलते, त्यादरम्यान त्याचा संयम सुटतो. आणि तिच्यावर ओरडताना दिसतो. “तुझं हे वर्तन खूप चुकीचं आहे. तू मला आयुष्यात आजवर काही दिलं नाही. किमान मला मनाची शांतता तरी दे. मला तुझी लाज वाटत असून तुझी ही सर्वात वाईट बाजू मी कधीही पाहिली नव्हती.” त्याचबरोबर तो हेदेखील म्हणाला की, “जर तुला कोणा एकाबरोबर व्यवस्थित राहू शकते, तर माझ्याबरोबर राहू शकते.”, असं म्हणत तो रूमबाहेर पडला. त्यानंतर अंकिता विकीला बोलावते, मात्र तो त्याकडे दुर्लक्ष करताना दिसला.

हे देखील वाचा – Video : ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची रोमँटिक डेट, एकमेकांच्या प्रेमात बुडालं मराठमोळं जोडपं, अभिनेत्री म्हणते, “त्याला ट्रोल करतात…”

So #AnkitaLokhande is called “Boss Lady” of the house ???
Boss lady who takes BS from her husband but try to put all blame on #MannaraChopra
Instigating #Abhisekh to call Mannara “Parineeti ki copy” as she knows her trigger point #BiggBoss17
pic.twitter.com/c8rDVjhHs9

— Nahýan (@Media_Tak1) October 27, 2023

दरम्यान, अंकिता व विक्कीच्या या वादाचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर समोर आले. जे पाहून अभिनेत्रीचे चाहते नाराज झाले. तसेच, नेटकऱ्यांनाही विक्कीचं अंकिताबरोबरचे वर्तन पटलं नसून त्यांनी विक्कीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी विक्कीने अंकिताशी जे वर्तन केले ते अशोभनीय असल्याचे म्हणाले. तर काहींनी अंकितामुळे विक्की बिग बॉसच्या घरात आला असल्याचे म्हणत त्याला ट्रोल केले आहे.

हे देखील वाचा – ‘ठाकरे’ चित्रपटानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार, ‘ही’ महत्त्वाची भूमिका साकारणार

Vicky bro she is your wife your doing this to her on national television its not good.#VickyJain #AnkitaLokhande #BiggBoss17

pic.twitter.com/UHziN5c6PN

— ᴀꜱɪᴍ ʀɪᴀᴢ ᴜɴɪᴠᴇʀꜱᴇ ???? (@AsimRiazworld) October 26, 2023

दोघांच्या या वादाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाली आहे. तो नेहमीच त्याच्या पत्नीवर अनेकदा चिडलेला दिसतो. ज्यामुळे ती अनेकदा नाराज झाली आहे. तसेच एका एपिसोडमध्ये तो अंकिताला असंही म्हणाला होता की, “मी तुझा नोकर नाही, की तू सांगशील तसं करायचं. मी माझ्या पद्धतीने हा गेम खेळेल.” दरम्यान, नुकतंच आलेल्या शोच्या नव्या प्रोमोमध्ये सलमान खान विक्की जैनची खरडपट्टी काढताना दिसणार आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यात आणखी काय ट्विस्ट पाहायला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: ankita lokhande jainbigg boss 17Bigg Boss 17 Ankita Lokhandevicky jainVicky Jain angry on Ankita Lokhande in Bigg Boss 17
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Next Post
Kangana Ranaut replies to Subramanian Swamy

"स्त्रिया फक्त सेक्ससाठी नसतात" रावण दहनावरून कंगना रणौतचं सुब्रमण्यम स्वामी यांना सडेतोड उत्तर, म्हणाली, "राजकारणात आपली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.